Uddhav Thackeray on Suresh Bhaiyyaji Joshi : मायबोली मराठीचे महाराष्ट्रात लचके तोडण्यास सुरुवात असतानाच मुंबईमध्ये मराठी कुटुंबाला मराठी बोलण्यावरून मारहाण तसेच मराठी बोलण्यास सांगितलं म्हणून दमदाटी होत असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठीवरून केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी करत पुन्हा एकदा भाषावादामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उभ्या महाराष्ट्रातून होत आहे. त्यांच्या सर्व वक्तव्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे वाग्बाण सोडत समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांचा उल्लेख अनाजी पंत असा करत कोरटकरप्रमाणे जोशी चिल्लर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं असं आव्हान दिले. 

मात्र, औरंगजेब, अनाजी पंत जन्माला येत असल्याचे दुर्दैव

उद्धव ठाकरे जोशी यांच्यावर सडकून प्रहार करताना ते म्हणाले की, भैय्याजी जोशी यांनी काल विधान केलं आणि गोमूत्र म्हणायचे की काय ते शिंपडून गेले. छत्रपती शिवाजी पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत.असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की मराठीवूरन विष कालवून गेले आहेत. पहिल्यांदा बटेंगे तो कटेंगे म्हणत होते आता मराठा आणि मराठेतर वाटणी करायची आणि राज्य करायचे असा यांचा डाव असल्याचा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी हे वक्तव्य तमिळनाडूमध्ये अहमदाबादमध्ये बोलून दाखवावं आणि सुखरूप बाहेर येऊन दाखवावं, असं आव्हान सुद्धा दिले. 

भैय्याजी चिल्लर माणूस आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून दाखवावं

ते म्हणाले की मराठी माणूस मत देणार, तो जातो कुठे असा त्यांना प्रश्न पडतोय का अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली भाषावार प्रांत झाले असताना आता गल्लीवर प्रांत करत आहेत का अशी विचारणा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, प्रशांत कोरटकर मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिल्लर असल्याचं म्हटलं होतं. तोच संदर्भ पकडत भैय्याजी चिल्लर माणूस आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून दाखवावं असा आव्हान त्यांनी दिले. मराठी भाषा नाही आली तरी चालेल म्हणणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी असे ते म्हणाले. नाही तर भाजप आणि संघाचा छुपा अंजेडा असल्याचा मान्य करावे असा टोला त्यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या