Uddhav Thackeray Live : शिवसेना पक्षप्रमुख यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी रणशिंग फुंकले. गोरेगावमध्ये शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेला खिंडार पाडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पहिल्याच मिनिटात कडाडून हल्ला चढवला. 


भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगत इरादा स्पष्ट केला. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यासपीठावर आल्यानंतर दोन गोष्टी पाहिल्या. एक रिकामी खूर्ची आहे, मी एक खुलासा करू इच्छितो नाही, तर उद्या एक चौकट यायची संजय राऊत मिंधे गटात गेले. मिंधे सगळे तिकडे गेले आहेत, पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय. आणि लढाईसाटी सोबत आहे, तलवार हाती घेऊन आघाडीवर आहे. आणि दुसरी गोष्ट पाहिली आमचे वडील आहेत का व्यासपीठावर. कारण मुलं पळवणारी टोळी ऐकलीय, पण बाप पळवणारी औलाद सगळ्या महाराष्ट्रातून फिरतेय. 


दरम्यान, शिवसेनेच्या आजच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर खासदार संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे. ईडीने कारवाई केलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्यामागे संपूर्ण पक्ष ठाम असल्याचा संदेश देण्यात आला आहे. 


दरम्यान, शिवसेनेचा शाण असलेला दसरा  शिवतीर्थावर होणार की नाही यावरून बरीच चर्चा सुरु असताना दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगत त्यांनी एल्गार केला आहे. गेल्या महिन्याभरापासून  शिवसेनेच्या अर्जावर मुंबई महापालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे बीकेसी मैदान शिंदे गटारकडून निश्चित करण्यात आल्याने उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य होते. त्यांनी आता यावर स्पष्ट भाष्य करताना शिवतीर्थावरच होणार असल्याचे ठणकावून सांगितले. 


शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर परवानगी देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.



भाजपवरही कडाडून हल्लाबोल 


उद्धव ठाकरे यांनी भाजपचा कमळाबाई असा उल्लेख करत कडाडून हल्ला चढवला. मुंबईवर सध्या गिधाड फिरत आहेत. लचके तोडणारी औलाद फिरत असल्याचा घणाघात त्यांनी केला. अमित शहा यांनाही उद्धव ठाकरे यांनी ललकारताना तुम्ही जमीन दाखवाच आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू, असे जाहीर आव्हान दिले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या