Uddhav Thackeray on Grand March: राज्यात पहिलीपासून सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात आज (29 जून) आझाद मैदानातून रणशिंग फुंकण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाकडून आझाद मैदानात महायुती सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीच्या आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसे नेते नितीन सरदेसाई, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, सुभाष देसाई, संतोष शिंदे, अभिनेता हेमंत ढोमे, काँग्रेस प्रवक्ते युवराज मोहिते सुद्धा उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सगळेच गुलाम झाले नसल्याची प्रतिक्रिया दिली. मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीनेही सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली. 

5 जुलैचा महा भव्य मोर्चा असेल 

 उद्धव ठाकरे यांनी पाच जुलै रोजी निघणारा मोर्चा हा महा भव्य मोर्चा असेल असे सांगितले. दरम्यान, मोर्चा काढण्याची वेळ येऊ दिली जाणार नाही असा आम्ही या संदर्भात प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. या संदर्भात विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळेच गुलाम झाले नाहीत ही चांगली गोष्ट आहे. मात्र, कोणाचा दुराग्रह आहे हे कोण हे कोणी सांगत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पाच जुलै रोजी होणारा मोर्चा हा महा भव्य मोर्चा असेल असे त्यांनी नमूद केलं. त्यांनी सांगितले की जीआरची होळी केली आहे याचा अर्थ जो लागू आहे असे आम्ही मानत नाही.

राज्यभरात प्रतिकात्मक आंदोलन 

आझाद मैदानात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली त्याच पद्धतीने राज्यभर सुद्धा हिंदी सक्तीच्या शासन आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी हिंदीला विरोध नसल्याचे सांगत सक्तीला विरोध असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. नाशिक, पुण्यासह मुंबईमध्ये सक्तीच्या हिंदीविरोधात आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे, याला विरोध म्हणून भाजपकडून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. मुंबईत भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आंदोलन केले. 

इतर महत्वाच्या बातम्या