Uddhav Thackeray on Dhananjay Mahadik : भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये बंधू अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ बोलताना लाडक्या बहिणींना जाहीर धमकी दिली होती. जर महाविकास आघाडीच्या सभेला जाणाऱ्या महिला आढळल्यास त्यांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो अशा शब्दात जाहीर धमकी  महाडिक यांनी  दिली होती. यानंतर विरोधकांनी धनंजय महाडिक यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे.






मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सडकून प्रहार केला आहे. बार्शीमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाडिक यांच्यावर तोफ डागली. ठाकरे म्हणाले की धमकी देतोस की काय? मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक यांना इशारा दिला. 


घरातून पैसे देतो आहेस की काय?


ते पुढे म्हणाले की घरातून पैसे देतो आहेस की काय? मी जाहीर सभांमधून हे सांगत आहे कारण मला मुन्ना महाडिक माहीत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ आमच्या सभेला महिला आल्यामुळे धमकी दिल्यास याद राखा हात जागेवर ठेवणार नाही, यांचा माज इतका वाढला आहे की पंधराशे देतो म्हणजे महाराष्ट्रातील महिला भगिनी यांच्या नोकर झाल्या आहेत असे यांना वाटत असल्याची टीका सुद्धा ठाकरे यांनी केली. ठाकरेंनी यापूर्वी वाशिममधील सभेमधून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी महाडिक यांच्यावर घणाघाती प्रहार करताना कोल्हापूरचा मस्तवाल असा उल्लेख केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या