Uddhav Thackeray : अनेक वर्षांनंतर आम्ही दोघे व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं सूचक वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही, झाली तर चर्चा करु शकतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवरही हल्लाबोल केला. 

मी स्वत: पिककर्ज मुक्तीची घोषणा केली होती. आम्ही सुरु केलं तेव्हा सरकार पाडलं गेलं.  मी अनुभव नसताना पहिल्या अधिवेशनात केलं, तुम्ही मंत्री आहात, खाती असतात, अभ्यास कसला करत आहात कर्जमुक्तीसाठी असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय, हे कर्ज फेडणार कसं?

माझा चेहर हसराच असतो, मी रेडा कुठे कापला नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. आज अधिवेशन संपत आहे. 3 आठवड्याचं अधिवेशन होतं. जनतेच्या समस्या संदर्भात प्रश्न होते. मुख्यमंत्र्याचं भाषण कसं होतं, आईला मुलगा म्हणतो आईस्क्रिम हवं आहे. आता काही होत नाही भविष्यात हे होईल असे म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. पुरवण्या मागण्यावर जास्त भर दिला. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. हे कर्ज फेडणार कसं? कर्ज कमी कसं करणार? योजनाचं काय लाडका भाऊ बहिण याची उत्तर नाहीत असे ठाकरे म्हणाले. 

सत्तेच्या लालसेपोटी राजकारण सुरु

कालच विधानभवनात हाणामारी झाली, अध्यक्षांनी उच्चस्तरिय चौकशी नेमली आहे. या गुंडांची इतकी हिंमत झाली आहे. कारवाई एकायला चांगली आहे, मात्र धाडस झालं कसं? असा सवाल ठाकरेंनी केला. सत्तेच्या लालसेपोटी हे राजकारण सुरु आहे. हे सत्तेच माजकारण आहे असे ठाकरे म्हणाले. चड्डी गॅंग माईक टाईसन समजतात. गळ्यात दात घालून फिरणारे कसे माजलेत. यांना कोणी जाब विचारणार की नाही असे ठाकरे म्हणाले.

 3 हजार कोटींची चोरी सुप्रीम कोर्टान पकडली तरी चोर फिरतोय

पीक विमा रद्द केला आहे. 3 हजार कोटींची चोरी सुप्रीम कोर्टान पकडली तरी चोर फिरतोय असे ठाकरे म्हणाले. विधानभवनात अशा घटना घडत असतील तर राष्ट्रपती राजवट लागू करावी असे ठाकरे म्हणाले. याला मी स्वप्न रंजन वाटीका म्हणतो. विरोधी पक्षनेता पाशवी बहुमत असताना देत नाही. अल्पमतातलं सरकार मांडता येत नाही. व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने त्रिभाषा सूत्र आणत आहे. मात्र, आम्ही तो आणून देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट वचायला हवी. राष्ट्रीय शैक्षणीक धोरण 2020 वाचून दाखवत आहेत असे ठाकरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय; 3 वर्षे शिव्या-शाप म्हणत एकनाथ शिंदेंनी भडास काढली, हिशेब चुकता