Uddhav Thackeray Today On Kalyan Visit : मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. एकनाथ शिंदेसोबतच्या (Eknath Shinde) सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कल्याण दौऱ्यावर (uddhav thackeray kalyan visit) येत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी अंबरनाथ, कल्याण आणि डोंबिवली भागात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे हे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण,आणि डोंबिवलीसह कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. हा दौरा आज पूर्ण दिवसभर असून, कल्याण मतदारसंघात आपल्या गटाची ताकद किती आहे याचा अंदाज उद्धव ठाकरे घेणार आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर उध्दव ठाकरे यांनी कल्याणला यावे, यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी अग्रही होते. अखेर दीड वर्षानंतर उद्धव ठाकरे कल्याणच्या दौऱ्यार आले आहेत. या दौऱ्यावत ते कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. येथील विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातील कल्याण लोकसभा मतदारसंघात नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांचे मित्रपक्षातील आमदारांशी सख्य नसल्याची चर्चा असल्याने या संधीचा फायदा उठविण्याची तयारी ठाकरेंच्या पक्षाने सुरू केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवलीमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
कसा असेल दौरा -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा या ठिकाणी उद्धव ठाकरे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटी घेणार आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा दौरा असेल. उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघातला दौरा. दौऱ्याची सुरुवात अंबरनाथ पासून होईल. कल्याण डोंबिवली आणि मुंब्रा इथल्या शाखांना भेट देऊन शेवट कळवा येथील शाखेजवळ करण्यात येईल.
श्रीकांत शिदेंचा टोला -
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्हासनगर ते कळवा असा दौरा पार पडणार आहे. हा दौरा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात असून या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे रोड शो करत अनेक नागरिकांशी संवाद देखील साधणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र यापूर्वीच असा दौरा केला असता तर आज ही वेळ आली नसती माझ्या मतदार संघात त्यांचे स्वागत आहे असा टोला कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा शेजारी शेजारी आला होता. उद्धव ठाकरे कल्याणला जात असताना मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंच्या ताफ्या शेजारून प्रवास झाला.