शिवाजी पार्क (मुंबई) : शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे समीकरण गेल्या पाच दशकांपासून राहिलं आहे. शिवतीर्थावरून राज्यभरातून नव्हे तर देशभरातून लाखो शिवसैनिक दसऱ्याला विचारांचे सोने लुटण्यासाठी येतात. आज विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. 


कोणतेही गट दोन गट नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकच गट


या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. या दसरा मेळाव्यामध्ये एक विशेष आकर्षण आहे ते म्हणजे प्रति बाळासाहेब ठाकरे. त्यांचे नाव कांतीलाल मिश्रा आहे. ते मुळचे पुण्यातील असले, तरी ते सध्या मुंबईत असतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर दसरा मेळाव्याला नेहमीच बाळासाहेबांच्या वेशभुषेत दसरा मेळावासाठी येत असतात. त्यांच्याशी आज एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी कांतीलाल यांनी सांगितले की, शिवसेनेमध्ये कोणतेही गट दोन गट नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकच गट असल्याचे सांगितले. त्यांनी बाळासाहेबांच्या वेशभूषेत संवाद साधला. 



फक्त निवडणूक येऊदेत, जनता यांना दाखवून देईल.


कांतीलाल म्हणाले की, जेव्हा बाळासाहेब पुण्यामधील त्यांच्या घरी येत असत, तेव्हा त्यांचं घर आणि आमचं घर जवळचं होतं. मी 20 वर्षांचा असल्यापासून बाळेसाहेबांना पाहतोय आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे. ते म्हणतात की, शिवसेनेत दोन गट आहेत, पण असं काही. गट फक्त एकच आणि तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आमदार घेऊन गेला, मुख्यमंत्रिपद घेतलं. पण तुम्ही कोणाची खूर्ची खेचली? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या रक्ताची खूर्ची खेचली. फक्त निवडणूक येऊदेत, जनता यांना दाखवून देईल. त्यांनी वरपर्यंत फिल्डींग पक्ष घे, चिन्ह घेण्याचे उद्योग केले. 


इतर महत्वाच्या बातम्या