Uddhav Thackeray : आम्ही स्पिरिट कायम ठेवले आहे. आमच्यात जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्याला खड्यासारखे बाहेर काढून टाकू असे मत ठआकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पक्ष चोरले, आहे तुम्ही गान गायले ते देखील चोरले आहे. पण हे प्रेम माया चोरु शकत नाही असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना लगावला.

Continues below advertisement

मुंबईची हवा घातक होत चालली आहे

मुंबईची हवा घातक होत चालली आहे. मुंबईचा श्वास विकास गुदमरुन टाकत आहे. प्रदूषण हे कशामुळं झाले आहे तर इथोपियाच्या धुळीचे लोट आहेत, असे उत्तर देत आहेत. पण मुंबई आणि महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार झाला त्याचा लोट आहे. भगवा एकच आहे. मुंबईचा महापौर हिंदू होणार असं बोलत आहे.  अरे आम्ही मराठी महापौर केला तो काय हिंदू नव्हता का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कांदिवली येथे कोंकणाचो मालवणी महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले आहे. 23 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका शुभदा गुढेकर आणि शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांच्याकडून करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित होते. आहे. 

Continues below advertisement

मराठी हळुवारपणे मारत चालले आहेत

मराठी हळुवारपणे मारत चालले आहेत. आम्ही मराठी मारु देणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीचे तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे गाणे आहे. हिंदची सक्ती करु नका. आम्हाला हिंदीचा द्वेष नाही, पण हिंदी सक्ती करू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांचा एक मंत्री येऊन गेला सांगून गेला आयआयटी बॉम्बे आमच्याकडून राहून गेले. पण आम्ही सांगतोय जिथे जिथे बॉम्बे आहे तिथे तिथे मुंबई करु असे उद्धव ठाकरे म्हणाले. याच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. हा आपला बालेकिल्ला आहे इथे भगवाच फडकणार असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  

आमच्यात जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्याला खड्यासारखे बाहेर काढून टाकू

आम्ही स्पिरिट कायम ठेवले आहे. आमच्यात जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्याला खड्यासारखे बाहेर काढून टाकू असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पक्ष चोरले आहे तुम्ही गान गायले ते चोरले आहे पण हे प्रेम माया चोरू शकत नाही असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना लगावला. एक दणदणीत मालवणोस्तव हा गिरगाव चौपाटी वर झाला आहे, मला तिथे हा उत्सव करायचा आहे तिथल्या लोकांना ही कळू दे. दशावतार लावणी हे सगळे चौपाटी वर झाले पाहिजे. पुढच्या महिन्यात कदाचित निवडणुका होतील तयारी झाली आहे का सगळ्यांची असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

दुबार मतदार यादीत नाव बघा. पंतप्रधान बोलतात ना वन नेशन वन इलेक्शन आम्ही बोलतो वन पर्सन वन वोट असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही एकजुटीने राहिलात तर आपण बघून घेऊ छत्रपती सेनेचा भगवा कोणात उतरावयाची ताकद आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी शिवसेना म्हंटले सोबत आता मनसेही आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.