Mahavikas Aghadi Delegati on Election Commission: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Local Body Election 2025) महाविकास आघाडीच्या शिष्ठमंडळाकडून आज (15 ऑक्टोबर) सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. यावेळी निवडणूक आयोगावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी अनेक प्रश्नांना निवडणूक आयोगाचे अधिकारी निरुत्त झाल्याचे दिसून आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा जोपर्यंत मतदार यादीमधील लफवाछपवी बंद होऊन पारदर्शीपणा येत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सुद्धा मतदारयादीतील घोळाकडे लक्ष वेधले. आयोगासमोर यादी ठेवताच आयोगाने चौकशी करतो, असे आश्वासन दिले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मतदार यादीतील घोळावर आयोगासमोर भाष्य केलं. 

Continues below advertisement

तुमची वेबसाईट कोणी वेगळा माणूस हँडल करतो (Jayant Patil on Election Commission) 

जयंत पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मतदार यादीतील घोळ दाखवून दिला. ते म्हणाले की नालासोपाऱ्यातील मतदाराचे नाव होते सुषमा यादव. मात्र ही खोटी मतदार आहे. आम्ही तिथं गेलो असता शहानिशा केली. मात्र, संध्याकाळी हे नाव काढले गेले. त्यामुळे तुमची वेबसाईट कोणी वेगळा माणूस हँडल करतो, असा आमचा आरोप असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सकाळी नाव असते. संध्याकाळी बातम्या येताच नाव डिलीट कसं होतं? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली.  काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगांमध्ये देवांग दवे कोण आहे याची माहिती घ्या अशी मागणी केली. हा भाजपचा माणूस असून निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो, असा गंभीर आरोप आयोगासमोर केला. ते म्हणाले की यादीमध्ये इतका घोळ असेल तर मग ही निवडणूक पारदर्शक असे म्हणता येईल? अशी विचारणा केली. 

VVPAT नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या (Uddhav Thackeray Election Commission)

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा अशी मागणी केली. ते म्हणाले की जर तुम्हाला सर्व पुरावे देऊनही तुम्ही व्हीव्हीपॅट वापरणार नाही म्हणजे तुम्ही सगळे पुरावे नष्ट करणार आहात, निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही, असा टोलाही  ठाकरे यांनी लगावला. VVPAT नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या