सातारा : फलटणमध्ये पालखी स्थळावर तीन भाविकांना विजेचा धक्का लागला. या दुर्घटनेत दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज (16 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली.

पालखी स्थळावरुन ट्रक पंढरपूरच्या दिशेने जात असताना या तिघांचा लोंबत असलेल्या तारेला स्पर्श झाला.

मृतांमध्ये ज्ञानोबा माधवराव चोपडे (वय 65 वर्षे) आणि जाईबाई महादू जामके (वय 60 वर्षे) यांचा समावेश आहे. ज्ञानोबा हे परभणी जिल्ह्यातील समतापूरचे रहिवाशी होते, तर जाईबाई या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रहिवाशी होते.

तर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कमलाबाई गोविंद लोखंडे (वय 65) या जखमी झाल्या आहेत.

दरम्यान, काल कविता तोष्णीवाल या महिलेचा रस्ता ओलांडताना ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. तोष्णीवाल या वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत ही दुर्दैवी घटना घडली.

संबंधित बातमी : वारीत अन्नदान करणाऱ्या महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
15 Jul 2018 11:25 AM