Kolhapur Crime : सांबर सदृश्य प्राण्याचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिस व वनविभागाने संयुक्तरित्या कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून स्नॅपर रायफलही ताब्यात घेण्यात आली आहे. शहा सैफुद्दीन शमशुद्दीन (रा. बंगळूर, कर्नाटक) व चेतन कुमार सुभाष चंद्र अभिगिरी (रा. गदग, कर्नाटक) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. 


पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तुडीये कोलिक रोडवर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे हे रात्रगस्त करत असताना एका पोल्ट्रीजवळ 10 ते 12 जण चार वाहनांसोबत संशयास्पद स्थितीत आढळून आले. यावेळी त्यांना हटकण्यात आले असता सर्वांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यामधील दोघांना ताब्यत घेण्यात आले. यावेळी एका संशयिताकडे स्नॅपर रायफल आढळून आली. एका वाहनांमध्ये वन्य प्राण्याचे मांस मिळून आल्याने वन विभागाचे अधिकारी प्रशांत आवळे वनक्षेत्रपाल पाटणे यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून वाहनाची तपासणी केली. यावेळी सांबर सदृश्य प्राण्याचे मास मिळून आल्याने दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या घटनेतील आरोपींची आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता वर्तवत तपास सुरु केला आहे. सदर कारवाई पोलीस व वन विभागामार्फत संयुक्तरित्या करण्यात आली. 


सदर कारवाईत पोलिस विभागाकडून पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, पोलिस उपनिरीक्षक जाधव, पोलिस शिपाई संदीप कांबळे, पोलिस नाईक डोंगरे, पोलिस शिपाई युवराज पाटील, पोलिस नाईक भदरगे यांनी सहभाग घेतला. वन विभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे एन. एन. धामणकर, वनपाल तुडिये बी. आर. भांडकोळी, वनपाल कळस गादे तांबेकर, वनरक्षक कोलिक एम. आय. सनदी वनरक्षक कोलिक 2 विश्वनाथ नार्वेकर चालक यांनी केली आहे. 


सदर कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक गडहिंग्लज नितेश खाटमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलिस व वन विभागाने संयुक्तरित्या केली. पुढील कारवाई एसीएफ एन. एस. कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत आवळे व वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे फाटा हे करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या