Tukaram Mundhe FDA News: एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आता शाळेतील कॅन्टीनबाबत तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शाळेच्या आवारात जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांना बंदी (Tukaram Mundhe School Canteen Marathi News) घालण्यात आली आहे. त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाचे पालकांकडून स्वागत केलं जात आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी प्रशासनात असायला हवेत अशी प्रतिक्रिया पालकांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
शाळेच्या परिसरामध्ये आजपासून फूड विक्री वरती बंदी घालण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाचं पालकांनी स्वागत केले आहे. घेतलेला निर्णय योग्य असून विद्यार्थी हिताचं असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. खाऊची दुकान दिसल्यानंतर मुलांचा होणारा हट्ट, त्यांचा आरोग्यावरती होणारे परिणाम याबाबत पालकांनी आपली मतं एबीपी माझाकडे व्यक्त केली. तसेच तुकाराम मुंढेंनी योग्य निर्णय घेतला आहे. असे निर्णय घेणं गरजेचं होतं. आज कोणीतरी धाडस दाखवलं, त्यामुळे तुकाराम मुंढेंचे आभार मानतो, असंही पालक म्हणाले. (Tukaram Mundhe FDA News)
एफडीएचे शाळांना फर्मान, कोणते आदेश? (Tukaram Mundhe School Canteen Marathi News)
- शाळा आणि 50 मीटर परिसरात जंक फूडवर बंदी
- चॉकलेट, कोल्ड्रिंक्सही विक्रीवर बंदी
- जंक फूडची विक्रीच नव्हे तर जाहिरातांनाही बंदी
- राज्यातील सर्व शाळांना बंदी आदेश लागू
- सर्व बोर्डांच्या शाळांना लागू असतील बंदी आदेश
- गोड आणि खारे अन्न पदार्थांच्या विक्रीवर बंदी
- चीप्स,समोसा,वडे,भजी अशा खोलवर तळलेल्या पदार्थांना बंदी
- फळे, भाज्या, कडधान्ये विक्रीस मुभा
- संपूर्ण धान्यांपासून बनवलेले पदार्थ, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ विक्रीस मुभा
- नियम मोडल्यास शाळा,कँटीनचालक,पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवान रद्द होणार
- पाळणाघर व डे केअर यांना बंदी आदेशातून वगळले.
50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी- (Tukaram Mundhe FDA News)
HFSS पदार्थांवर बंदी : शाळेच्या आवारापासून 50 मीटरच्या परिघात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त (HFSS) पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल.
जाहिरातींवर बंदी : अशा पदार्थांच्या जाहिराती करण्यासही शाळांच्या परिसरात मनाई असेल.
शाळांची जबाबदारी : या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असेल.
ईट राईट स्कूल आणि अन्न तपासणी- (Tukaram Mundhe FDA News)
शाळांना आहाराची आदर्श केंद्रे बनवण्यासाठी 'ईट राईट स्कूल' (Eat Right School) संकल्पना राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्न तपासणी : एफडीएकडून प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा अन्न तपासणी केली जाईल आणि अन्नाचा एक नमुना प्रयोगशाळेत तपासला जाईल.
फूड सेफ्टी बोर्ड व सुपरवायझर : प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी बोर्ड लावणे आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होतेय की नाही हे पाहण्यासाठी फूड सेफ्टी सुपरवायझरची नियुक्ती करावी लागेल.
पिण्याचे पाणी : शाळांमध्ये पिण्यायोग्य शुद्ध पाणी आणि स्वयंपाकगृहात उच्च दर्जाची स्वच्छता राखणे बंधनकारक आहे.
एफडीएचे शाळांना फर्मान, पालक काय म्हणाले?, VIDEO:
संबंधित बातमी:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI