Tukaram Mundhe News: सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम (FDA Maharashtra) राबवत आहे. अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. 

Continues below advertisement

आता कुठेही जेवण किंवा औषध भेसळयुक्त आढळल्यास एफडीकडे तक्रार करण्यासाठी तुकाराम मुंढेंनी एक सोपा मार्ग तयार केला आहे. सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे होय. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेले AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आता कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकतो, असं तुकाराम मुंढे म्हणाले. (Tukaram Mundhe News)

मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला...तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल- तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe FDA News)

कृत्रिम बुद्धिमत्ता तक्रार आपोआप तयार करते, ती संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते, विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे ट्रॅक करता येतो. नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाची उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे, असं तुकाराम मुंढे फेसबुक पोस्ट करत म्हणाले. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला...तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी दिली. 

Continues below advertisement

अन्न व औषधाबाबत किंवा गुटखा आणि पानमसालाबाबत नेमकी कुठे तक्रार करायची याची नागरिकांनी माहिती नसते. त्यामुळे आता मुंढे यांनी नागरिकांनी थेट त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर- (FDA Complaint Number)

    • टोल फ्री क्रमांक : 1800222365 
    • ई-मेल : jc-foodhq@gov.in

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!

Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर