प्रबळगडावर ट्रेकिंगला आलेल्या पुण्यातील तरुणाचा दरीत पडून मृत्यू
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 10 Feb 2018 07:42 PM (IST)
चेतन थांडे असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा पुण्याचा राहणारा होता.
नवी मुंबई : प्रबळगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यात घडली आहे. चेतन थांडे असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा पुण्याचा राहणारा होता. आज सकाळी मैत्रिणीसोबत तो ट्रेकिंगसाठी आला होता. मैत्रिणीबरोबर चेतन आज सकाळी प्रबळगडावर आला होता. कलावंतीन सुळका चढताना हा अपघात झाला. पनवेलमधील निसर्ग ट्रेकर्सच्या मदतीने पोलिसांनी मृत्यदेह बाहेर काढला. चेतनच्या मैत्रिणीने पोलिसांनी फोन करुन या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि निसर्ग ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.