दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राज्यसभेसाठी भाजपनं तिसरा उमेदवार दिल्यानं शिवसेनेसमोर कडवं आव्हान, भाजपकडून पियूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिकांना उमेदवारी
2. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून परराज्यातील उमेदवारांना संधी, महाराष्ट्रासाठी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडींच्या नावावर शिक्कामोर्तब, आज राज्यातील प्रमुख नेत्यांची सोनिया गांधींसोबत बैठक
3. मुख्यमंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या शाहू महाराजांची राऊतांकडून भेट, तर महाराजांना किडक्या डोक्यानं चुकीची माहिती दिल्याचा फडणवीसांचा आरोप
4. मान्सून केरळात दाखल, हवामान विभागाची माहिती, आठवडाभरात महाराष्ट्रात आगमनाची शक्यता
मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांना दिलासा मिळाला आहे. अखेर रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. सरासरी मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. यावेळी मात्र, तीन दिवस मान्सून आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, मान्सून दाखल होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि मान्सून दाखल होण्यासाठीचे संकेत काय आहेत, यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे.
5. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात, ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक भरता येणार
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 30 मे 2022 : सोमवार
6. हुनमानाचा जन्म किष्किंधात झाल्याचा दावा करणाऱ्या गोविंदानंद यांच्या रथाला अंजनेरीकरांचा विरोध, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
7. गंभीर आजारामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मृत्यू झाल्याचा MI6चा दावा, डेली स्टारचं वृत्त, सध्या सत्तेवर पुतिनऐवजी त्यांचा बहुरुपी असल्याची चर्चा
8. नेपाळच्या तारा एअरलाईन विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये चार मुंबईकरांचा समावेश, तर सिक्कीममधल्या अपघातात ठाण्यातील सराफ व्यापाऱ्याच्या कुटुंबाचा करूण अंत
9. प्रसिद्ध पंजाबी गायब सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या, आप सरकारनं सुरक्षेत कपात करताच हत्या झाल्यानं आरोपांच्या फैरी
10. आयपीएलमधला नवीन संघ गुजरात टायटन्सला यंदाच्या मोसमातलं विजेतेपद, राजस्थान रॉयल्सचा चारली पराभवाची धूर, हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी
कर्णधार हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या गुजरात संघानं अंतिम सामन्यात राजस्थानचा (Rajasthan Royals) सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात राजस्थाननं गुजरातसमोर अवघ्या 131 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हार्दिक पंड्या आणि सलामीच्या शुभमन गिलनं तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची निर्णायक भागीदारी रचून गुजरातला विजयपथावर नेलं. हा सामना जिंकल्यानंतर गुजरातच्या संघानं आणि संघाच्या कर्णधारानं अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.