(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 30 जून 2022 : बुधवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
2. सेलिब्रेशन करताना उतू नका, मातू नका, भाजप नेत्यांकडून कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन
3. देवेंद्र फडणवीस लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार, सागर बंगल्यावर सकाळी प्रमुख भाजप नेत्यांची खलबतं, आमदारांचा मुंबईतला मुक्काम वाढला
4. ठाकरे सरकारला धक्का देणाऱ्या बंडखोर शिंदे गटाची वाट अडवू नका, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन, बंडखोर आज मुंबईत परतण्याची शक्यता
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline : शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळाल. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं. आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला.
5. रस्ते कामातील गैरव्यवहारप्रकरणी बच्चू कडू यांना मोठा दिलासा, पुरावे नसल्याचं सांगत पोलिसांकडून फाईल बंद
6. ठाकरेंच्या राजीनाम्यापूर्वी मविआ सरकारचे तीन मोठे निर्णय, औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देणार
7. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी, मावळते पोलीस आयुक्त आयुक्त संजय पांडे आज सेवानिवृत्त होणार
8. दही, पनीरसह अनेक दुग्धजन्य पदार्थ, गूळ, सेंद्रीय खतांवर 5 टक्के जीएसटी, चेकसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर 18 टक्के, हजारापेक्षा कमी दराच्या हॉटेल्स रुमवर 12 टक्के जीएसटी
9. आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात, यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त, भाविकांमध्ये उत्साह
10. टी-20 क्रमवारीत दीपक हुडाची मोठी झेप; संजू सॅमसन, हर्षल पटेलाही फायदा, फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये फक्त इशान किशन