(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 14 एप्रिल 2022 : गुरुवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Top 10 Maharashtra Marathi News :दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन, दिवसभर एबीपी माझावर विशेष कार्यक्रमातून महामानवाला अभिवादन
2. पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतरचं फोन संभाषण माझाच्या हाती, आंदोलकांना रेल्वेचं तिकीट दिल्याचं संभाषणातून समोर, हल्ला पूर्वनियोजित असल्याच्या संशयाला वाव
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Sharad Pawar)यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या अभिषेक पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान काही खळबळजनक माहिती हाती लागली आहे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागलं आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाकडे मोर्चा वळवला. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे.
3. क्रूझ ड्रग्ज पार्टीशी संबंधित एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित, अधीक्षक विश्वविजय सिंह आणि इटेलिजेन्स ऑफिसर आशीष रंजनप्रसाद यांच्यावर कारवाई
4.नवाब मलिकांच्या 8 मालमत्तांवर ईडीची टाच, उस्मानाबादेतली 148 एकर जमिनीसह मुंबईतील 5 फ्लॅट्स आणि व्यावसायिक जागेवरही जप्तीची कारवाई
5.आयएनएस विक्रांत निधीप्रकरणात दिलासा मिळताच किरीट सोमय्या 5 दिवसांनंतर प्रकटले, पुढचा नंबर अनिल परब यांचा, सोमय्यांचा इशारा
6. सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळं पर्यटन स्थळांवर गर्दी, भ्रमंतीसाठी कोकणाला सर्वाधिक पसंती, प्रसिद्ध देवस्थानांकडे भक्तांची रीघ
7.इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात, कीर्तनासाठी जात असताना जालना जिल्ह्यात दुर्घटना, महाराजांना दुखापत नाही
8.मुंबई पोलिसांचा अजब कारभार; भोपाळमधील दुचाकीस्वाराला सीट बेल्ट न लावल्यानं पाठवलं ई-चलान
9. आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबेडीत अडकणार, शुभमंगल सावधानसाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची आवर्जून हजेरी
10. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सलग पाचव्यांचा पराभव, पंजाबविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारची एकाकी लढत अपयशी