एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 06 जुलै 2022 : बुधवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापुरात रेड अलर्ट, एनडीआरएफच्या टीम्स तैनात

2. पावसाचा जोर कायम राहिल्यास आज कृष्णा, पंचगंगा नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा, प्रशासनाच्या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सूचना

3. काहीशा विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरांत पुन्हा पावसाला सुरुवात, हवामान विभागाकडून रेड अलर्ट, मुंबई लोकलसेवा सुरळीत 

मुंबई (Mumbai) आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु होता. सकाळी काही काळ पावसानं विश्रांती घेतली होती. काहीशा विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत अनेक तासांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरळीत असून पश्चिम रेल्वे त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. मात्र अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 आणि 8 जुलैला मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

4. शिवसेनेचे 11 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती, भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी सेना खासदारांचं पत्र

5. शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा तर गद्दारांच्या डोळ्यात विकृत हसू असल्याचा ठाकरेंकडून उल्लेख

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 06 जुलै 2022 : बुधवार

6. विधानसभेतल्या शिंदेंच्या भाषणावर उद्धव ठाकरेंचा निशाणा, भाषण करताना रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याचा टोला तर रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका, शिंदेंचं प्रत्युत्तर

7.  राज्यात मध्यावधी निवडणुका लागणारच, पवार, राऊतांपाठोपाठ, आदित्य ठाकरेंचं विधान, तर तयारी लागलो, राऊतांची प्रतिक्रिया

8. अमरावतीतील उमेश कोल्हेंच्या हत्येतील मुख्य आरोपीला बलात्कारच्या गुन्ह्यात जेल, 'लव जिहाद'चा आरोप

उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेला इरफान याला मध्यप्रदेश मधील इंदोर पोलिसांनी बलात्कारच्या गुन्ह्यात त्याला 19 दिवस जेल झाली आहे. एका विवाहित महिलेला इरफान याच्या मित्राने आणि इरफानने पळवून आणले, तिला जबरदस्ती बुरखा घालून घरी डांबून ठेवले आणि जबरदस्तीने बलात्कार केला अशी पीडित महिलेने ऑगस्ट 2021 मध्ये इंदोर पोलिसात तक्रार दिली होती. तेव्हा पोलिसांनी इरफान आणि त्याचे तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. या प्रकरणात त्यावेळी इंदोर येथील विवाहित महिलेच्या कुटुंबांनी लवजिहादचा आरोप केला होता, उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेला इरफान याला मध्यप्रदेश मधील इंदोर पोलिसांनी बलात्कारच्या गुन्ह्यात त्याला 19 दिवस जेल झाली आहे.

9.  प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर अंगडी यांची निर्घृण हत्या, कर्नाटकमधल्या हुबळीतली घटना, चार तासांत दोन्ही आरोपी अटकेत

10. ज्ञानोबांच्या पालखीचं खुडूस फाट्याजवळ दुसरं गोल रिंगण, तर तुकोबा रायांची पालखी बोरगाव मुक्कामी जाणार, माळीनगरमध्ये  तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Embed widget