Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 05 सप्टेंबर 2022 : सोमवार : एबीपी माझा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. अखेरच्या षटकांपर्यंत चाललेल्या सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव, सलामीच्या मोहम्मद रिझवानची निर्णयाक खेळी, भारताला चुका नडल्या
1. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर, भाजप नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक, लालबागचा राजा आणि प्रमुख नेत्यांच्या घरी गणपतीचं दर्शन
3. टाटा समुहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाच्या चौकशीचे आदेश, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, अतिवेगाने गाडी चालवल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा
Cyrus Mistry Death in Car Accident : टाटा समूहाचे (Tata Group) माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं काल (रविवारी) निधन झालं आहे. रस्ते अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad Highway) चारोटी येथे हा अपघात झाला. अतिवेगानं गाडी चालवली जात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या या अपघातात गाडी चालक आणि सायरस मिस्त्री या दोघांचं पार्थिव रात्री मुंबईत दाखल झालं आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल.
सायरस मिस्त्री यांचं पार्थिव आज मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आलं आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल. त्यानंतर सायरस मेस्त्री यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सायरस मिस्त्री यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत पार्थिव जे. जे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. सायरस मिस्त्री यांचे भाऊ आणि मुलं आज रात्री मुंबईत आल्यानंतर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सायरस मिस्त्री यांचं पोस्टमार्टम रात्री अडीच वाजता पार पडलं आहे. मृत्यूच नेमकं कारण थोड्याच वेळात समोर येण्याची शक्यता असल्याची 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
4. माहेरवाशीण आलेल्या गौराईला आज निरोप, गणपती-गौरी विसर्जनासाठी प्रशासनाकडून तयारी, कृत्रिम तलावावर विसर्जन करण्याचं आवाहन
5. शिक्षक दिनानिमित्त आज राष्ट्रपतींच्या हस्ते 46 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश, पंतप्रधानही शिक्षकांशी संवाद साधणार
6.आधी पाण्याअभावी पिकं वाळली, आता तुफान पावसानं उरलीसुरली पिकं वाहून गेली; लातूरमध्ये मुसळधार
7. पंजाबच्या मोहालीतल्या जत्रेत पाळणा कोसळला, दुर्घटनेत 16 जण जखमी, अंगावर काटा आणणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद
8. तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड, वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी भक्ताला 14 वर्षे वाट पाहायला लावल्यानं ग्राहक न्यायालयाचा निर्णय
9.शिक्षकदिनी यूजीसीचं मोठं गिफ्ट; 5 वेगवेगळे अनुदान आणि फेलोशिपची घोषणा; सावित्रीबाईंच्या नावानंही एक फेलोशिप
10. ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण होणार याकडे जगाचं लक्ष, भारताचे जावई ऋषी सुनक आणि लीज ट्रस यांच्यात चुरशीची लढत