एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE UPDATES | मध्यप्रदेशातील बैतुलमधील सामूहिक बलात्काराची पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

LIVE

LIVE UPDATES | मध्यप्रदेशातील बैतुलमधील सामूहिक बलात्काराची पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

Background

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. दिल्लीत हिंसाचार करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे पोलिसांना आदेश, दिल्लीत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, हिंसाचारात आतापर्यंत 13 जण दगावले
2. बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार अनिल भोसलेंसह 4 जणांना अटक, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 71 कोटींच्या घोटाळ्याचा ठपका
3. सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देणाऱ्या ठाकरे सरकारकडून वचनभंग, फडणवीसांचा सरकारवर घणाघात, तर 50 हजार शेतकऱ्यांची पत्रं राज्यपालांना सुपूर्द
4. समृद्धी महामार्गाची चौकशी करा, विधानसभेत पृथ्वीराज चव्हाणांची मागणी, अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जमीन लाटल्याचा आरोप
6. महिला अत्याचार थांबवण्यासाठी दिशा कायद्याच्या अनुषंगाने नवा कायदा तयार करणार, कायद्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना, 10 दिवसांत मसुदा सादर करणार
6. ट्रम्प दाम्पत्याला राष्ट्रपती भवनात शाही मेजवानी, राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून स्वागत, तर भारत-अमेरिकेत विविध करारारवर स्वाक्षऱ्या, ट्रम्प मायदेशी रवाना

एबीपी माझा वेब टीम

18:37 PM (IST)  •  26 Feb 2020

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी जाहीर केलेल्या समितीचा विस्तार करणार, सध्या या समितीवर अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह, सह पोलीस आयुक्त अमितेशकुमार असून या समितीमध्ये काही माजी अधिकारी आणि मंत्री अथवा आमदारांचा समावेश होण्याची शक्यता
21:38 PM (IST)  •  26 Feb 2020

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील झरप गावात लग्नाच्या जेवणातून 150 लोकांना विषबाधा, 103 लोकांवर मुरमाडी तुपकर (लाखनी) प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार
21:26 PM (IST)  •  26 Feb 2020

मध्यप्रदेशातील बैतुल मधील सामूहिक बलात्काराची पीडित अल्पवयीन मुलीचं आज नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झालाय. एक महिन्यापूर्वी तिच्यावर तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केले होते. त्यानंतर आरोपी तिला सातत्याने ब्लॅकमेल करत असल्याने तणाव आणि नैराश्याच्या स्थितीत पीडितेने काल संध्याकाळी बैतुल येथे राहत्या घरी स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते. 95 टक्के भाजलेल्या पीडितेला गंभीर अवस्थेत आज सकाळी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिचे मृतदेह करून आज दुपारी मध्यप्रदेशातील बैतुलला रवाना करण्यात आले आहे. पीडिता आठव्या वर्गात शिकत होती. एक महिन्यापूर्वी तिच्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती.
21:35 PM (IST)  •  26 Feb 2020

माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या एक दिवशीय लाक्षणीक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. वाशीतील भाजी मार्केट आणि पळ मार्केट सुरू असताना माथाडी कामगारांनी दादागिरी करून व्यापार बंद पाडण्याचा प्रयत्न केला. माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यातील परपस्परविरोधी भूमिकेमुळे संपाला फटका बसल्याची चर्चा आहे.
21:12 PM (IST)  •  26 Feb 2020

ठाकरे सरकारची भाजपवर पुन्हा कुरघोडी, भाजपचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी यांची पुनर्वसन प्राधिकरणावरची नियुक्ती शासनाने केली रद्द, फडणवीस सरकारमधल्या प्राधिकरण आणि महामंडळांवरच्या अनेक नियुक्त्या रद्द करण्याचं ठाकरे सरकारचं सत्र सुरूच, आज महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्ष पदावरून माधव भंडारी यांना हटवले
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget