Nagpur News : राज्यातील वाघांच्या मृत्यूची (Tiger deaths) उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यातआलीआहे. राज्यात जानेवारीच्या पहिल्या काही दिवसात चार वाघांचा मृत्यू झाल्याचीमाहितीआहे. तर 2025 सुरुवातीला अवघ्या 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू झाला होता. परिणामीयागंभीरविषयाची वाघांच्या उच्च न्यायालयाकडून (High Court) गंभीर दखल घेण्यातआलीआहे. परिणामीहे वाघांच्या मृत्यूचे प्रकरण आता न्यायालयात गेलंआहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांना याविषयीदखल घेतली असून याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

Buldhana News : ज्ञानगंगा अभयारण्यात मर्यादित अधिवासातील वाघाने जाळी तोडून केला पोबारा

बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात चार वर्षांपूर्वी T1C1 हा वाघ रहस्यमय रित्या बेपत्ता झाला होता. त्यानंतर वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातून 36 महिन्यांचा PKT7CP1 हा वाघ गेल्या तीन जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात आणला. मात्रत्याला आणल्यानंतर या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात तयार करण्यात आलेल्या जाळी लावून मर्यादित अधिवासात ठेवण्यात आलं होतं. मात्र काल रात्री या वाघाने जाळी तोडून अभयारण्यात पोबारा केला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातूनच बुलढाणा खामगाव हा महामार्ग क्रमांक 753 E जातो व या महामार्गावरून भरदा वाहने सुरू असतात. त्यामुळे या वाघाच्या अस्तित्वाला आता धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, हा वाघ आता अभयारण्य परिसरात मुक्त संचार करत असल्याने अभयारण्य नजीक असलेल्या गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना आता वन्यजीव विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मात्र वाघाच्या संरक्षणासाठी अभयारण्यातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करणे आवश्यक असल्याचं बोललं जात आहे.

Bhandara : थरार!!! अड्याळच्या जंगलात वाघाचा 'रॉयल वॉक', वाहनधारकाचा रस्ता अडवून घातला फेरफटका

भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रातील एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. अड्याळ ते किटाळी मार्गावर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात एका रुबाबदार वाघानं चक्क एका वाहनधारकाचा रस्ता अडवला. पहाटेच्या सुमारास हा वाघ रस्त्यावर एखाद्या राजासारखा वावरत असताना या व्हिडिओतून बघायला मिळाला. अगदी पहाटे ६ वाजता या मार्गावरून जाणाऱ्या एका वाहनधारकाच्या वाहनसामोर अचानक हा वाघ आला. जंगलव्याप्त भागात एक वाघ रस्त्याच्या मधोमध रुबाबानं चालत होता. वाहन समोर आलं तरी, वाघानं आपली चाल बदलली नाही. उलट, तो काही वेळ वाहनाच्या पुढे तर, कधी मागं फिरत राहिला. वाघानं रस्ताचं अडविला नाही तर, काही मीटर दूर अंतरापर्यंत वाहनं रिव्हर्स न्यायला भाग पाडली. सुमारे १५ ते २० मिनिट वाघानं या वाहनाचा रस्ता अडवून धरला होता. यावेळी वाहनधारकाची प्रचंड घाबरगुंडी उडाली. वाघाचा हा 'रॉयल वॉक' जितका डोळ्यांचे पारणे फेडणारा होता, तितकाचं तो अंगावर काटा आणणाराही होता. वन विभागानं या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.

रानडुकरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक; भंडारा वन विभागाची बेरोडी इथं कारवाई

पिकप वाहनांमधून वन्यप्राणी असलेल्या रानडुकराची तस्करी करणाऱ्यांना भंडारा वन विभागानं पाच जणांना अटक केली. ही कारवाई भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मार्गदर्शनात बेरोडी पुनर्वसन इथं करण्यात आली. या रानडुकरांची नागपूर इथं वाहतूक करण्यात येणार होती. तत्पूर्वी वन विभागानं सापडा रचून पिकअप वाहनासह रानडुक्कर आणि त्याची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी रानडुकरांना जंगलात सोडून त्यांना जीवदान देण्यात आलं तर, पाच जणांच्या विरोधात वन गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.