Bhandara News Update : वाळू माफियांसोबत मटण पार्टी करणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. वाळू माफियांसोबत पार्टी करणाऱ्या तीन पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. दिलीप धावडे, खुशांत कोचे, राजेंद्र लांबट असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस शिपायंची नावे आहेत. 


भंडाऱ्याच्या  उपविभागीय अधिकाऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून आणखी सहा आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या याच आरोपींसोबत पार्टी केल्याप्रकरणी तीन पोलीस शिवायांना निलंबीत करण्यात आले आहे.   


भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील बेटाडा गावात 27 एप्रिल रोजी पहाटे वाळू माफियांनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उप विभागीय अधिकऱ्यांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात उप विभागीय अधिकारी रवींद्र राठोड आणि पोलीस उप निरीक्षक राऊत हे जखमी झाले होते. याच प्रकरणी पवनी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या नऊ पैकी तीन आरोपींना अटक केली आहे.


पथकावर हल्ला करणारे आरोपी नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील दि मर्शी हॉटेलमध्ये होते. पोलिसांना आरोपी या हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पकडण्साठी पोलीस गेले होते. यावेळी हे आरोपींची मटण पार्टी सुरू होती. आरोपींना पकडण्यासाठी गेलेले पोलीसह त्यांच्यासोबत मटण पार्टीत सहभागी झाले. यावेळी हे पोलीस वर्दीवर होते. वाळू माफियांसोबत मटण पार्टी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. त्यामुळे याबाबच तपास कूरन पोलीस अधीक्षक वंसत जाधव यांनी तीन पोलीस शिपायांना निलंबित केले. 


बुधवारी पहाटे कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील बेटाळा घी गटाना घडली होती. यात एसडीओ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाळू माफियांनी यावेळी पथकाच्या वाहनाच्या काचाही फोडल्या होत्या. 


महत्वाच्या बातम्या


वाळूमाफियांना अभय देणं अधिकाऱ्यांच्या अंगाशी! पाच तलाठी निलंबित तर तहसीलदाराची बदली, साताऱ्यातील कारवाईनं खळबळ