पुणे : भाजप (BJP) नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करणाऱ्या ( Throwing Lnk) तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय आहे. त्यांच्यावर भादवि कलम 307 ,353, 294, 500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1) आणि 135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर संतापाची लाट पसरली. चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी देखील तीव्र शब्दात आक्षेप घेतला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगीरी देखील व्यक्त केली. परंतु, काल पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. शाई फेकल्या प्रकरणी पोलिसांनी तत्काळा तिघांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शाई फेक प्रकरणातील तिघांनाही आज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तिघांनाही कोर्टात घेऊन जाताना कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून नेय याची पोलिसांनी पुरेपूर काळजी घेतली होती.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिघांवरही 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करून राजकीय द्वेशातून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केलाय. या तिघांनी देखील 307 सारखा गुन्हा केला नाही, परंतु, त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलाय. पोलिस यंत्रणांवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक हा गुन्हा दाखल केलाय. परंतु, याविरोधात आम्ही हायकोर्टात जावू आणि दाद मागू असे त्यांच्या वकिलांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या