मुंबई : मुंबईत सीएएविरोधात पुकारण्यात आलेल्या महामोर्चाला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. जवळपास 65 संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महाविकास आघाडीचे नेतेही या मोर्चात सहभागी होणार आहेत.


सीएए, एनआरसी आणि तत्सम कायद्याविरोधात मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी इतर परिसरातल्या एकूण 65 संघटना आझाद मैदानावर एकवटल्या आहेत. त्यामुळं आझाद मैदानातल्या आंदोलनाला महामेळाव्याचं स्वरुप आलं आहे. संविधान बचाव आणि भारत बचावच्या नाऱ्यानं आझाद मैदान परिसर दुमदुमला होता.

CAA NRC Protest | सीएए-एनआरसीविरोधात 65 संघटनांचा मोर्चा, महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्रीही सहभागी



आंदोलनाला सपाच्या अबू आझमीसह वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. एनआरसीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळावा असं आवाहन अबू आझमी यांनी केलं आहे.

संविधान वाचले तरच देश वाचेल अस आंदोलकांचे म्हणणे आहे. देश भरात सीएए, एनआरसी आणि एनआरपीच्या बाबत जे आंदोनल सुरू आहे, त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला विरोध म्हणून महामोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.