यवतमाळ : राज्यातील एसएसी बोर्डाची परीक्षा (Exam) सुरू झाली असून आणखी पुढील 15 दिवस ही परीक्षा चालणार आहे. या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी कॉपी पुरविण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अर्थाच, राज्य शासनाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान जोरकसपणे राबवले असले तरी काही ठिकाणी कॉपी करण्याचा अनुचित प्रकार घडल्याने या अभियानाला गालबोट लागलं. एकीकडे विद्यार्थ्यांना (Student) कॉपी पुरविण्यासाठी नातलग, कुटुंबीय आणि शिक्षक मदत करताना दिसून येतात. मात्र, दुसरीकडे डोंगराएवढं दु:ख कोसळूनही काही विद्यार्थी या परीक्षेला समारे जातात. इंग्रजी विषयाच्या पेपरला अवघे काही तास शिल्लक असताना वडिलाचे छत्र हरवले. मात्र, यवतमाळमध्ये (yawatmal) दुःखात बुडालेल्या एका विद्यार्थ्याने केवळ मुख्याध्यापकांच्या पाठबळाने परीक्षा केंद्रावर साश्रुनयनांनी दहावीची परीक्षा दिली. या विद्यार्थ्याच्या धैर्याचं आणि त्याला पाठबळ देणाऱ्या मुख्याध्यापकांचेही कौतुक होत आहे. 

यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सेवालालनगर, टाकळी येथील सुरज संजय जाधव हा विद्यार्थी इंदिरा गांधी विद्यालय गोकुंदा येथे इयत्ता दहावीत शिकत आहे. तो येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर शुक्रवारी परीक्षा देण्यासाठी पोहोचला होता. राज्यात 21 फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून पुढील 15 दिवस ही परीक्षा असणार आहे. शनिवारी 1 मार्च रोजी पहाटे सूरजचे वडील संजय जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वडिलांचा मृतदेह घरात, अंत्यविधी असा दुःखाचा डोंगर पार करुन इंग्रजी विषयाची परीक्षा द्यायची कशी? असा तो विचार करू लागला. मनाची घालमेल, वडिलांच्या निधनाच्या वेदना, यामुळे जवळजवळ सूरज नशिबाने ओढावलेल्या जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याचे चित्र होते. परंतु, अशावेळी त्याने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून मी परीक्षा देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर, मुख्याध्यापक राठोड यांनी सूरजच्या घरी जाऊन त्याचे सांत्वन करत परीक्षा देऊन तू तुझ्या बाबांना खरी श्रद्धांजली दे, असा मोलाचा सल्ला दिला. 

मुख्याध्यापक राठोड यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन त्यांच्या जीवनातील दुःखांवर त्यांनी केलेली मात त्याला पटवून सांगितली. त्यानंतर सुरज परीक्षा द्यायला तयार झाला, वडिलाचा अंत्यविधी करुन परीक्षेसाठी तो सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळा, किनवट या परीक्षा केंद्रावर आला. साश्रुनयनांनी त्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. सुरजच्या या धैर्य आणि धाडसाचे शिक्षकांसह त्याच्या मित्रांनी कौतुक केले. तसेच, वडिलांच्या निधनाबद्दल त्याची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले. दरम्यान,सूरजने आपल्यावरील कोसळलेल्या संकटातूनही परीक्षेवर मात करत आयुष्याच्या परीक्षेत स्वत:ला सिद्ध केलंय. त्यामुळे, सूरज हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. 

हेही वाचा

धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोडं वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI