Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये प्रकरणी एसआयटीने मोठा दावा केला आहे. आज बीड कोर्टापुढे सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मीक कराडला हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीकडून आरोपींच्या संदर्भातील माहिती देताना मोठा दावा करण्यात आला. संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येदिवशी अपहरण दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी ते साडेतीनपर्यंत करण्यात आलं होतं. त्याच दिवशी तीनच्या सुमारास दहा मिनिटांमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचे फोनवरून संभाषण झाल्याची माहिती एसआयटीने कोर्टामध्ये दिली.
दरम्यान, या तिघांमध्ये काय बोलणं झालं ते आता तपास करायचा असल्याने तिघांना दहा दिवस पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. एसआयटीने 9 ते 10 मुद्द्यांवर ते कोर्टाला माहिती देताना मोकाची कारवाई न्याय्य असल्याचे सांगितले. एसआयटीने वाल्मीक कराडने हत्येच्या दिवशी सुद्धा संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वाल्मीकला पोलीस कोठडीची मागणी एसआयटीकडून करण्यात आली. विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या पत्नीने वाल्मिक कराडने धमकी दिल्याने पती तणावात होते, अशी माहिती दिली आहे. आता एसआयटीकडून सुद्धा धमकीचा उल्लेख न्यायालयात करण्यात आल्याने वाल्मीकच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तीन आरोपींच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळतीजुळती
दरम्यान, एसआयटीने कोर्टात माहिती देताना सांगितले की, संतोष देशमुख यांच्या अपहरणआची वेळ आणि तीन आरोपींच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळतीजुळती आहे. दुपारी तीन ते सव्वा तीनच्या सुमारास संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं होतं. त्यावेळी जवळपास या तिघांमध्ये फोन कॉल झाल्याचे रेकॉर्डवरून दिसत असल्याचे एसआयटीने कोर्टासमोर माहिती देताना सांगितलं. दरम्यान, यावेळी वाल्मिक कराडविरोधात गुन्ह्यांची मालिका सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली. इतर आरोपींविरोधात असलेली गुन्ह्यांची माहिती सुद्धा देण्यात आली. वाल्मीक कराडकडून सातत्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचा दवा करण्यात येत आहे. त्याच्या कुटुंबीयांकडून तसाच दावा करण्यात येत आहे. मात्र, एसआयटीकडून आज दिलेल्या माहितीने वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या