मुंबई : कोरोना बाधित रुग्णांवर फ्याबी फ्लू या गोळ्या गुणकारी ठरत असल्यामुळे या गोळ्यांची मागणी बाजारांमध्ये वाढलेली आहे, असं असताना गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी मात्र एका महिन्यात या गोळ्यांची किंमत रुग्णांसाठी 1 हजार रुपयांनी कमी केलेली आहे. सध्या कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त असलेल्या रेमेडेसिविर आणि टोसिलिझुम ही औषधे उपलब्ध होत नसल्याने फ्याबी फ्लू या गोळ्याची मागणी वाढलेली आहे.


संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच यावर कोणतीच लस उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक औषधांचा वापर हा रुग्णांवर करण्यात येत होते. यामध्ये सुरुवातीला अनेक औषधांचा वापर करण्यात येत होता. याच बरोबर रुग्णाला गोळ्यांच्या स्वरूपात फ्याबी फ्लू देण्यात येत आहेत. या गोळ्या गुणकारी ठरत असल्याने अनेक डॉक्टर या गोळ्यावर अधिक भर देत आहेत. या गोळ्याचं उत्पादन ग्लेन्मार्क कंपनी करत असून कालपर्यंत 34 गोळ्यांच्या एक पाकिटासाठी 3500 रुपये दर होता. तोच दर कंपनीने कमी करून हे गोळ्यांचे पाकीट 2500 रुपयांना उपलब्ध केले आहे. पूर्वी 103 रुपयाला गोळी होती. आता हीच गोळी 75 रुपयाला उपलब्ध झाली आहे. त्या मुळे एका गोळी मागे 27 रुपये बचत झाली आहे.


रेमडेसिविर आणि टोसिलिझुम हे थेट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतात. मात्र फ्याबी फ्लू या गोळ्या मेडिकल मध्ये उपलब्ध आहे. रेमंडेसिविर आणि टोसिलिझुमपचा तुटवडा असल्यामुळे पर्यायाने फ्याबी फ्लूची मागणी वाढली आहे. रेमडेसिविर आणि टोसिलिझुम च्या तुटवड्यामुळे पर्यायाने हे उपलब्ध आहे. या गोळ्यांच्या उत्पादन आणि वापरात चार महिन्याचे अंतर आहे , या गोळ्या 4 महिन्यात वापराव्या लागणार असल्याने याचा काळाबाजार अथवा साठा करता येणार नाही. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणालाही ही देता येत नाहीत. या गोळ्यांच्या पाकिटात एक फॉर्म येतो . तो फॉर्म डॉक्टर आणि रुग्णाने भरून देणे बंधनकारक आहे.


सध्या कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून फ्याबी फ्लू या गोळ्या गुणकारी ठरत आहेत. या गोळ्यांचे उत्पादन करण्या साठीचा कच्चा माल ग्लेन्मार्क कंपनीला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या मुळे कंपनीने याचा फायदा थेट रुग्णांना व्हावा यासाठी या गोळ्याची किंमत तब्बल 1 हजार रुपयांनी कमी केली आहे.


कोरोना रुग्णांवर सध्या या औषधांचा वापर करण्यात येतो.
1) Hcqs
2) डॉकसी सायक्लिग
3) अझिथ्रो मायसिंन
4) फ्लू वे
5) ट्यामी फ्लू
6) रेमडीसीविर
7) टोसुलीझीम
प्रतिक्रिया -


प्रसाद दानवे ( महाराष्ट्र ड्रॅग अँड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष )


कोरोनाबाधित रुग्णांना रेमडीसीविर या इंजेक्शनचा डोस देण्यात येतो. मात्र सध्या बाजारात या इंजेक्शनचा तुटवढा वाढल्याने त्याला पर्याय पाहिला जातो. सध्या डॉक्टर फ्याबी फ्लू या गोळ्या रुग्णांना देतात. या गोळ्यांना सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. या गोळ्यांची किंमत साडेतीन हजार रुपये आहे. मात्र रूग्णांसाठी कंपनीने या गोळ्यांवर तब्बल एक हजार रुपये कमी केली असून याची आजपासून ची किंमत अडीच हजार रुपये आहे. सध्या गोळ्यांचा साठा मुंबईत मुबलक प्रमाणात करण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील या गोळ्या उपलब्ध होत असल्यामुळे कोरोना रुग्णांना आता दिलासा मिळालेला आहे. महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.


महेश पाटील (रुग्णाचे नातेवाईक)


माझ्या एका नातेवाईकाला कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे या गोळ्यांचा डोस आणण्यासाठी मी मेडिकल मध्ये आलोय. या गोळ्या मला मेडिकलमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. मात्र गोळ्यांच्या पाकिटामध्ये एक फॉर्म आहे. हा फॉर्म डॉक्टर आणि रुग्णांनी भरून देणे बंधनकारक आहे . त्यामुळे मी हा फॉर्म डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी तो भरून त्याच्यावर सही शिक्का दिला. तो मी पुन्हा या मेडिकलमध्ये जमा करण्यासाठी आलेलो आहे. यापूर्वी मी अनेक औषधी खरेदी केलेली आहेत. मात्र गोळ्यांच्या पाकिटामध्ये असणारा हा फॉर्म मी प्रथमच पाहत आहे. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिल्या जात नाहीत.


संबंधित बातम्या :


कोरोनावरील फॅबीफ्लू औषधावर खासदार अमोल कोल्हेंचा आक्षेप, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलं पत्र 


Paper Sanitizer Machine | कागदपत्रांच्या निर्जंतूक करणारं मशीन, नवं मशीन अजित पवारांच्या दालनात