Sangli News : इस्लामपूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजप जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वत: गाडीतून उतरुन वाहतूक कोंडी सुरळीत केली. रविवारी सायंकाळी साडेसहा ते सात या कालावधीत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अर्ध्या तासाने वाहतूक कोंडी सुरळीत झाल्याने अनेक प्रवाशांनी श्वास सोडला व निशिकांत भोसले यांचे आभार मानले. 


गेल्या अनेक महिन्यांपासून इस्लामपूर शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस यंत्रणा सुस्त आहे. शहरातील सिग्नल व्यवस्थेचे बारा वाजल्याने वाहतूकदार व प्रवाश्यांना नाहक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर बहुमुल्य वेळही गमवावा लागत असल्याने प्रशासन व पोलिसांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.


शहरात चव्हाण काॅर्नर,कामेरी नाका, आष्टा नाका या शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आली होते. शहरासाठी वाहतूक नियंत्रण पोलिस विभागही कार्यरत आहे. मात्र, वरील तिन्ही ठिकाणचे सिग्नल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. तर वाहतूक नियंत्रण पोलिस विभाग व या विभागात काम करणारी कर्मचारी शोधण्याची वेळ शहरवासीय व प्रवाशांवर आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या