राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 29 Dec 2018 11:13 AM (IST)
एकीकडे राज्यात काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा सुरू असतांना आंबेडकरांनी आघाडीच्या चर्चेला आणखी एक धक्का दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडीचा राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
अकोला : एकीकडे राज्यात काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा सुरू असतांना आंबेडकरांनी आघाडीच्या चर्चेला आणखी एक धक्का दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडीचा राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघातून आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सिरस्कार अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार आहेत. ते सलग दुसऱ्यांदा भारिपचे आमदार म्हणून बाळापुरातून विजयी झाले आहेत. आंबेडकरांनी शेगाव येथे झालेल्या माळी एल्गार परिषदेत आमदार सिरस्कारांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. सिरस्कारांच्या माध्यमातून राज्यातील माळी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी केला आहे. आंबेडकरांच्या या नव्या पवित्र्याने काँग्रेससोबत त्यांच्या संभाव्य आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कोण आहेत बळीराम सिरस्कार - भारिप-बहुजन महासंघाचे विधानसभेतील एकमेव आमदार - अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार - पक्षाच्या कोअर समितीचे सदस्य. - भारिप-बहुजन महासंघाचा माळी समाजाचा चेहरा - अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष