अहमदनगर : राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला आजपासून सुरुवात होणारं आहे. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. यामध्ये आतापर्यंत 31 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळं अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रथम युक्तिवाद करतील. त्यांनंतर मुख्य आरोपीसह तीनही आरोपींचे वकील युक्तिवाद करतील. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.
साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत अंतिम युक्तिवाद होऊन डिसेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे.
कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले होते, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.”
संबंधित बातम्या :
कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
=कोपर्डी बलात्कार: साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव!
कोपर्डी बलात्कार आणि हत्येला एक वर्ष पूर्ण
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई