Thane Municipal Corporation : कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण असलेला ठाणे महानगरपालिकेचा 2022-2023 सालचा 3299 कोटी रूपयांचा मुळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला. मागील वर्षी 2755 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. म्हणजेच या वर्षी अर्थसंकल्पात तब्बल 544 कोटींची वाढ करण्यात आल्याचे दिसून आले. या अर्थसंकल्पात आरोग्य आणि पाणीपुरवठा वर मुख्यतः सर्वाधिक भर दिला आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळेच अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणेकरांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोना काळात महापालिकेचे उत्पन्न घटल्याने महापालिकेची तिजोरी रिकामी झाली असतानाच नवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.


निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात ठाणेकरांचे श्रद्धास्थान धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्यासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कळवा येथील प्रस्तावित नाट्यगृह वागळे विभागात हलवण्यात आले असून, ारतातील पहिल्या क्‍लस्टर योजनेसाठी तब्बल 149 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासोबतच तलावांचे सुशोभीकरण, भूमिगत वाहनतळ, खारेगाव येथे ट्रक टर्मिनल, थीम पार्क, रस्त्यांची डागडुजी, जांभळी नाका मार्केट पुनर्वसन आणि फिल्म इन्स्टिट्यूट ची निर्मिती अशा गोष्टींसाठी निधीची तरतूद या वर्षी करण्यात आली आहे.


निधींची तरतूद  -
तलाव सुशोभिकरणासाठी १० कोटी, धर्मवारी आनंद दिघे स्माकर ५ कोटी, जांभळी नाका मार्केट पुनर्विकास ५ कोटी, पार्कीग सुविधांचे निर्माण आणि भुमिगत वाहनतळ १० कोटी, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व अद्यावतीकरण २६ कोटी, शहर सौंदर्यीकरणासाठी १५५ कोटींची तरतूद, शाळा परिसरात सुरक्षा उपाय योजना १० कोटी, अर्बन डेन्स फॉरेस्ट्री ५ कोटी, थीम पार्क विकसित ४ कोटी, फिल्म इन्स्टिटय़ुट ५ कोटी, रस्ते सुरक्षेसाठी फुटपाथ १० कोटी, पाणी पुरवठा विस्तार व मजबुतीकरण ५० कोटी, वाहतुक नियमन उपाययोजना १० कोटी, रस्त्यांचे पुनर्पृष्टीकरण १० कोटी, मॉडेल मिल येथे ट्रक टर्मिनस १ कोटी, वागळे इस्टेट येथे नाटय़गृह ५ कोटी, खारेगाव ट्रक टर्मिनस ५ कोटी, क्लस्टर या महत्वकांक्षी योजनेसाठी १४९ कोटी, प्रदुषण नियंत्रणासाठी विविध उपाय योजना ४८ कोटी, माझी वसुंधरासाठी १० कोटी, घनकचरा व्यवस्थापन २० कोटी, कचरा संकलनासाठी यंत्रणा १० कोटी, भंडार्ली येथील कचरा प्रकल्प 5 कोटी, कचरा वेचकांचा सहभाग ५ कोटी, महापालिका शाळा मजबुतीकरण २० कोटी, कळवा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय १० कोटी, पार्कीग प्लाझा येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्याचा मानस, टाटा कॅन्सर हॉस्पीटल, पाणी पुरवठा योजना सक्षमीकरण, वितरण व्यवस्थेचा विस्तार, महसुल न मिळणा:या पाण्याचे प्रमाण कमी करणो, दिवा येथे अद्यायावत रुग्णालयासाठी ५ कोटी, किसनगर येथे मॅटर्निटी रुग्णालय सुरु करण्याचे प्रयोजन आखण्यात आले आहे.