Thane Mira Bhayandar Crime : मिरा भाईंदर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या मार्फत 501.6 ग्रॅम वजनाचा व 1 कोटी 32 हजार रुपये किमतीचा एमडी मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सहा जणांविरुद्ध काशिगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक गस्त करत असताना वेस्टन हॉटेल बाजू कडून हाटकेश चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 6 जण संशयास्पद दिसून आले होते. या सर्वांची चौकशी व झडती घेतल्याने त्यांच्या जवळ अंमली मिळून आले. सहा जणांना अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला मध्ये 501.6 ग्रॅम वजनाचा व 1 कोटी 32 हजार रुपये किंमतीचा एमडी अंमली पदार्थ, बुलेट, बर्ग मॅन, स्प्लेंडर व ॲक्टीव्हा अशी 04 वाहने, 08 मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांविरुद्ध काशिगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: