ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळेच्या गळ्याभोवती ACB चा फास, मालमत्तेची होणार चौकशी
Thane Crime News : ठाणे महानगरपालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शंकर पाटोळेच्या गळ्याभोवती ACB ने फास आवळायला केली सुरुवात केली आहे.
Thane Crime News : ठाणे महानगरपालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शंकर पाटोळेच्या गळ्याभोवती ACB ने फास आवळायला केली सुरुवात केली आहे. ACB पाटोळे यांच्या मालमत्तेची चौकशी करणार आहे. पाटोळेच्या मूळ गावी जाऊन नातेवाईकांची देखील चौकशी होणार आहे. पाटोळेनी गेल्या तीन वर्षात एकूण किती माया जमवली याचा हिशोब होणार आहे.
सखोल चौकशी झाल्यानंतर पाटोळेच्या विरोधात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता
ज्या दिवशी घटना घडली त्या संदर्भातील पुरावे तपासण्याचे काम सुरु आहे. लाच मागतानाचा पाटोळेचा आवाजाचा ऑडिओ आणि नोटांवरील ठसे फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आले आहेत. 15 ते 20 दिवसात सखोल चौकशी झाल्यानंतर पाटोळेच्या विरोधात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
पाटोळे सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.
शंकर पाटोळे यांना 25 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई एसीबीने अटक केली आहे
ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना 25 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई एसीबीने पाटोळे यांना ठाणे महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापनदिनी अटक केली. त्यानंतर या प्रकारचा संपूर्ण तपास ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी पाटोळे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्या पुन्हा ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यासह दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होणारं आहे.
बिल्डरकडून अतिक्रमण हटवण्याची मागणी, उपायुक्त शंकर पाटोळेंनी मागितली 35 लाखांची लाच
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बिल्डरची ठाण्यातील घंटाळी परिसरात जागा आहे. या जागेत अतिक्रमण झाल्याने बिल्डरकडून हे अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाशी संपर्क साधला. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी त्यांच्याकडे कारवाईसाठी 35 लाखांची लाच मागितली. या प्रकरणाची तक्रार बिल्डरने थेट मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. एकीकडे ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा होत असताना दुसरीकडे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्ताला 35 लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतल्याने त्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या संपत्तीची देखील चौकशी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:


















