Thane Ambernath News : पोलीस भरतीत सतत अपयश येत असल्यानं एका 26 वर्षीय तरुणीची  आत्महत्याकेली आहे. अंबरनाथ पश्चिम भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रतीक्षा राणे असं तरुणीचं नाव आहे. या तरुणीनं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.  

तुम्हाला जे जीवन द्यायचं होतं, मला नोकरी न लागल्यानं ते देता आलं नाही

आई बाबा मला माफ करा, तुम्हाला जे जीवन द्यायचं होतं, मला नोकरी न लागल्यानं ते देता आलं नाही, अशा आशयाची नोंद सुसाईड नोटमध्ये आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीनं आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूण तरुणींमध्येही या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत प्रतीक्षा ही गेल्या काही वर्षापासून पोलीस भरतीचा सराव करत होती. पोलीस विभागात नोकरी करुन आपल्या आई वडिलांना सुखी ठेवण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र प्रत्येक वेळी पोलीस भरतीत तिला अपयश येत असल्यानं या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलण्यात आलं होतं. 

जळगावातील जोशी कॉलनीत आठवीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या केली

जळगावातील जोशी कॉलनीत ला.ना. शाळेच्या आठवीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रथम हरीश कटारे असे आत्महत्या करणाऱ्या 15 वर्षीय मुलाचे नाव आहे. प्रथम हा अभ्यास करत नाही म्हणून त्याची आई त्याला रागावली, त्याचे वाईट वाटून घेऊन प्रथम याने घरी कोणी नाही असे पाहून घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बायकोच्या व्हाट्सअप स्टेटसवर अश्लील कमेंट, जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या 

मुंबईच्या नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. बायकोच्या व्हाट्सअप स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेचार वाजता नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे ही घटना घडली. आफताब शेख (24) असे या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे आफताब शेख (24) हा पत्नी शबाना शेख (22) हिच्यासोबत रहात होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे फातिमा शबानाने आपल्या व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले होते. ते स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (22) याने कमेंट केली होती. याच मुद्द्यावरून त्यानंतर मेहंदी याने शबानाला इंस्टाग्राम या समाज माध्यमाव अश्लील शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी शबाना शेख आणि तिचा नवरा आफताब शुक्रवारी सकाळी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील मेहंदी हसनच्या घरी गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून मेंहदीने चाकूने आफताब शेख याच्यावर वार केले. त्यात त्याचा जागेच मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या:

बड्या अभिनेत्याच्या लेकीने गोळी झाडून स्वतःला संपवलं, राहत्या घरात मृतदेह दिसला अन्...मनोरंजनसृष्टीत खळबळ