मुंबई:  आज संपूर्ण राज्याचं लक्ष हे मुंबईमधील वरळी डोम येथील ठाकरेंच्या विजयी मेळाव्याकडे लागलं आहे. तब्बल 18 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. भावांच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याची सर्वांचा उत्सुकता लागली आहे. हिंदीच्या मुद्यावर ठाकरी तोफा धडाडणार आहेत. मराठी अस्मितेसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असले तरीसुद्धा आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आज घडणारी ही सर्वात मोठी घडामोड आहे. दरम्यान आता सोबत येत असलेले ठाकरे बंधू हे आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का? असा सवाल उपस्थित झालेला आहे. त्या अनुषंगाने एबीपी माझाने सोशल मिडीयावरती याबाबतचा पोल घेतला होता, त्यामध्ये राज्यातील मराठी लोकांना काय वाटतं ते जाणून घेऊया पोलच्या आकडेवारीतून:

आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का?

(updated time 10:30am)

X Resultsहोय : 72.9%नाही : 15.6%माहिती नाही  : 11.5%एकूण मतं : 347

YouTube Resultsहोय : 91%नाही : 6%माहिती नाही  : 3%एकूण मतं : 29,000

Instagram Resultsहोय : 74%नाही : 16%माहिती नाही  : 11%एकूण मतं : 2,850

Facebook Resultsहोय : 100%नाही : 0%माहिती नाही  : 0%एकूण मतं : 20

WA Resultsहोय : 301नाही : 47माहिती नाही  : 20एकूण मतं : 368

स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 

 मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच आता या मेळाव्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील, भाषणं फक्त 4 जणं करतील ऐनवेळी एकादा चेहरा वाढेल, अशी माहिती मिळत आहे.