Maharashtra ATS Action: राज्यात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS Action) यवतमाळच्या पुसद, उमरखेड आणि अहिल्यानगरमध्ये असे 21 ठिकाणी छापेमारी करतमोठीकारवाईकेलीआहे. 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू करण्यातआलेल्यायाकारवाईत एटीएसने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्याआहेत. ज्या संशयीतांच्या घरांवर छापे टाकले ते सर्व तरुण अतिउच्च शिक्षित आहे. तर हे तरुण देशभरातील काही 'टेररिस्ट मॉड्युल'च्या संपर्कात (Terrorist Organization) आल्याचीही माहिती आहे. गेल्या सहा महिन्यापासून या तरुणांच्या संशयास्पद कारवायांकडे एटीएसचे लक्ष होतं.
Maharashtra ATS Action: तरुणांचा इंटरेस्ट पाहून ब्रेनवॉशिंग, पैसा, खेळाची संधी, नोकरी अशी आमिष
अशातचयासंशयाच्याआधारावर एटीएसने छापा टाकतमोठीकारवाईकेलीआहे. तरहे तरुण आकार घेत असलेल्या 'टेररिस्ट मॉड्युल'मधील 'की पर्सन'. यांच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या भरतीची योजना आखातहोते. यवतमाळमध्ये 14 आणि अहिल्यानगरमध्ये सात ठिकाणी पथकांनी कारवाई केली होती. प्रत्येक पथकाच्या कारवाईत वेगवेगळी निरीक्षणे नोंदवली गेलीत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तरुणांचा इंटरेस्ट पाहून त्या पद्धतीने त्यांचं ब्रेन वॉशिंग होत असल्याची माहिती तपासातपुढेआलीआहे. पैसा, खेळाची संधी, नोकरी अशी वेगवेगळी आमिष दिली गेल्याचीही माहिती आहे. या छाप्यानंतर अद्यापही कुणाला अटक करण्यातआलेली नाही. मात्र, या छाप्यानंतर मिळालेल्या माहितीमधून एक मोठं दहशतवादी कनेक्शन उघड करण्यात एटीएसला यश आलंआहे. तर अहिल्यानगरसह यवतमाळमधील छाप्यची संभाव्य कारणं काय? हेजाणूनघेऊ.
Maharashtra ATS : अहिल्यानगरसह यवतमाळमधील छाप्याची संभाव्य कारणं काय?
-हिंदू-मुस्लिम दंगली झालेली गावे 'Soft Target' म्हणून 'टेररिस्ट मॉड्युल' तयार करण्यासाठीची प्रयोगशाळा करण्याचा अतिरेकी संघटनांचा मानस.
- या गावांमधील उच्चशिक्षित आणि अतिउच्च शिक्षित तरुणांवर दहशतवादी संघटनांचा डोळा.
- पुसद शहरात 2009 आणि 2014 मध्ये झाल्या होत्या मोठ्या दंगली.
- पुसदमध्ये 2009 मध्ये रामनवमीच्या दिवशी झाली होती दंगल.
- तर 2014 मध्ये झाली होती दुसरी मोठी दंगल.
- 2014 च्या दंगलीचे लोन शेजारच्या उमरखेड मध्ये पसरले होते.
- पुसद आणि उमरखेड हे दोन्ही तालुके आणि गाव मराठवाड्याच्या सीमेला लागून.
- मराठवाड्यातही जालना, छत्रपती संभाजीनगर येथे टेररिस्ट नेक्सस.
- छापा मारण्यात आलेला अहिल्यानगरमधील मुकुंद नगर भागा पूर्णतः मुस्लिम बहुल.
- मुकुंदनगर भाग लष्कराच्या प्रशिक्षण तळाला अगदी लागून.
- गेल्या काही काळात नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या हिंदुत्ववादी चळवळीमुळे अस्वस्थ असलेल्या मुस्लिम तरुणांना गळाला लावण्याचे प्रयत्न.
- अहिल्यानगरमधील तरूणाईच्या माध्यमातून छत्रपती सभाजीनगर, पुणे, नाशिक भागात नेटवर्क उभारण्याचा डाव.
