Solapur Temperature : दिवसेंदिवस तापमानाचा (Temperature) पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  सोलापूर (Solapur) जिल्ह्यात देखील उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेचा फटका थेट वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला (transformer) बसत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळं माढ्यातील (Madha) वरवडे येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. काल सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा सर्वच ठिकाणी वाढल्याचे दिसत असताना या अतिरिक्त उष्णतेचा फटका महावितरणच्या रोहित्रीला बसण्यास सुरुवात झाली आहे. 


जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्ती करून देण्याची मागणी 


माढा तालुक्यातील वरवडे गावातील महावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.  त्या रोहित्रावर 125 किलोवॅट पेक्षा जास्त भार असताना देखील रोहित्र मात्र 63 केव्ही चा असल्याने, अतिरिक्त उच्च दाबामुळे व तीव्र उष्णतेमुळे महावितरणच्या या रोहित्राचा स्फोट झाला आहे. राज्यातील सर्वाधिक उष्णतेची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली असताना, याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्ती करून देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.


विजेच्या मागणीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ


देशभरात नोव्हेंबर महिन्यापासून साधारणपणे थंडीला सुरुवात होते. थंडीचा हा हंगाम फेब्रुवारीपर्यंत असतो. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन उन्हाचा कडाका जाणवू लागतो. मात्र, यावेळी हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या तापमानामुळं विजेच्या मागणीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतीच्या वीज पंपाबरोबर घरचे फॅन, शेगड्या यांना देखील मोठ्या प्रमाणात वीज लागते. वाढत्या तापमानामुळं विजेची मागणी वाढल्यानं महावितरणवर देखील अतिरीक्त ताण येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  दरम्यान, वाढत्या तापमानाचा फटका शेती पिकांना देखील बसत आहे. पीक सारखी पाण्याला येत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासत आहे. अशातूनच अनेक ठिकाणी 63 केव्ही च्या ट्रान्सफॉर्मरवर 100 ते 130 ला लोड असल्याचं पाहायला मिळत आहे, तर अनेक ठिकाणी 100 च्या ट्रान्सफॉर्मरवर 180 ते 200 च्या आसपास लोड असल्याचं चित्र आहे.


महत्वाच्या बातम्या:


फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर