Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा (Heat) चटका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे चित्र दिसत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा (Temperature) पारा हा  40 ते 42 डिग्री से. राहण्याची शक्यता आहे. सरासरी कमाल तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता असल्याचे मत खुळे यांनी व्यक्त केले.  


ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मार्चला एक दिवस मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. 31 मार्चला पुन्हा राज्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचे खुळे म्हणाले. मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील मराठवाडा व लगतच्या विदर्भातील जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, नाशिक अहमदनगर अशा काही जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


महाराष्ट्र तापला! नेमका का वाढतोय राज्यात तापमानाचा पारा?