श्रीकांतचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारण विहिरीतील मोटर चोरीच्या आरोपावरुन पोलिसांनी श्रीकांतला पोलिस ठाण्यात बोलावलं होतं. तिथं त्याला बेदम मारहाण झाली आणि यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान, श्रीकांतला रात्रीच सोडून देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. श्रीकांतच्या पाठीवर मारहाणीचे व्रण आढळल्याने या हत्येचे गूढ वाढले आहे.
पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पलायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसंच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.
संबंधित बातम्या
अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती
अनिकेतची हत्या पोलीस खात्याला कलंक, दोषींना फाशी द्या: आठवले
अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न
अनिकेतच्या हत्येची SIT चौकशी करा, कोथळे कुटुंबीय हायकोर्टात
अनिकेत कोथळे हत्याप्रकरण : पोलीस अधीक्षक शिंदेंची अखेर बदली
अनिकेत कोथळेचे मारेकरी पोलिस सेवेतून बडतर्फ
अनिकेत कोथळेचा खटला उज्ज्वल निकम लढवणार : केसरकर
अनिकेतच्या हत्येचा आरोपी पीएसआय कामटेचा मुजोरपणा कायम
अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित