Sushma Andhare : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी विधानभवनात जो फोटो आणि व्हिडीओ दाखवला तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या फोटोमध्ये मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर आणि आमदार बाळासाहेब सानप हे भाजपचे नेते देखील होते, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी केलं.देवेंद्रजी तुमची ब्रिगेड अभ्यास करत नाही असेही त्या म्हणाल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. 


दरम्यान, या प्रकरणी आता नितेश राणे काय भाष्य करणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असेही अंधारे म्हणाल्या. दोन वर्षांपूर्वी लग्नाला उपस्थित राहिल्यानं अडचणीत आलेल्यां या प्रकणातून नावं वगळली जातात असेही त्या म्हणाल्या.


नितेश राणेंनी सभागृहात नेमका काय आरोप केला होता?


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला आहे.  सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast)  खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय. या पार्टीचे फोटोच नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली.


फडणवीसांचे एसआयटी चौकशीचे आदेश 


दरम्यान, याप्रकरणी  एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो  नितेश राणेंनी सभागृहात दाखवला आहे. मविआचं सरकार आल्यानं पेग, पेंग्विन आणि पार्टीला सुरुवात झाली, असे आशिष  शेलार म्हणाले. 


नितेश राणे म्हणाले, दाऊदच्या जवळचा  मुख्य आरोपी  93 च्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेप भोगतोय. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षासोबत पार्टी करतो. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो आणि व्हिडीओ आहेत.1993 चा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील यारोपी सलिम कुत्ता  हा पेरोलवर असताना तो पार्टी करतो. ⁠उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो, ⁠हे गंभीर आहे. याला कोणाचा  पाठींबा आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी, नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप