गांधीजींच्या चरख्यावर मोदी आले, उद्या नोटांवरही येतील : सुशीलकुमार शिंदे
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2017 11:41 PM (IST)
आज गांधींजींच्या चरख्यावर मोदी आलेत, उद्या नोटांवर मोदी येतील अशी टीका काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी केली.
सोलापूर : आज गांधींजींच्या चरख्यावर मोदी आलेत, उद्या नोटांवर मोदी येतील अशी टीका काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी केली. गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर त्यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं. सुशील कुमार शिंदे म्हणाले की, "सत्य, अहिंसा याचा जयजयकार करत, आम्ही स्वातंत्र्य मिळवलं. पण आज संपूर्ण देश असहिष्णूतेच्या मार्गाने जात आहे." ते पुढे म्हणाले की, " देशातील ज्या दलित, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केला. सर्वधर्म समभावाची पूजा केली. त्याच मुल्याच्या विरुद्ध आज देशात सर्वत्र घटना घडत आहेत. त्यामुळे महात्मा गांधींचा विचारच देशाला तारु शकेल." सध्या गांधीजींच्या चरख्यावर मोदी आले आहेत. उद्या नोटांवर मोदी येतील अशी टीका करताना सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले की, "अहंकारी प्रवृत्ती देशात अशांतता माजवते आहे."