Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड संदर्भातील बातम्यांचे व्हिडिओ पाहत असल्याच्या रागातून अशोक मोहिते याला जबर मारहाण झाली होती .कृष्णा आंधळेच्या मित्रांनी केलेल्या या मारहाणीत अशोक मोहितेच्या (Ashok Mohite) डोक्याला गंभीर दुखापत आणि आठ टाके पडले आहेत .त्याच्यावर लातूरमध्ये ICUमध्ये उपचार सुरू आहेत .धारूर पोलिसांनी अखेर आरोपींना कर्नाटकमधून अटक केल्यानंतर आका आणि त्यांच्या गॅंगचा माज अजून उतरला नाही .अशोक मोहिते प्रकरणात पकडलेले आरोपी हे कृष्णा आंधळेचेच मित्र आहेत .त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केली आहे .ते म्हणाले ,अशोक मोहितेंवर ज्यांनी वार केला ..संतोष देशमुख यांचे व्हिडिओ का पाहतो ?मृत सरपंचाच्या पोस्ट का टाकतोस ?म्हणून अशोकला मारले आहे .आकाच्या लोकांचा माज आणि मस्ती अजूनही गेली नाही .त्यांच्यातला माज अजून उतरला नाही .असेही धस म्हणाले . (Santosh Deshmukh case)
काय म्हणाले सुरेश धस ? (Suresh Dhas)
मी कधीच संतोषला पाहिलं नाही पण माझ्या कुटुंबातील अनेक लोक संतोषला ओळखतात .भारतीय जनता पक्षाच्या एका बूथवर संतोष आणि एका बूथवर धनंजय थांबलेले होते .माझ्या पक्षाच्या बूथ प्रमुखाची इतकी निर्घृणपणे हत्या केली आहे . याच्या तपासात कोणतेही कसूर राहू नये यासाठी धनंजय देशमुख यांनी भेट घेतली असल्याचं धस यांनी सांगितलं .तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह सगळ्या आरोपींच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजेत ,अशी मागणी ही त्यांनी केली .
सगळ्या आरोपींच्या नार्को टेस्ट करा : सुरेश धस
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत . मी कागदपत्रे गोळा करतोय . आम्हाला एसआयटी ला बरेच कागदपत्र द्यायचे आहेत .तपास अजून प्राथमिक आहे .आरोपीला अटक झाली आहे .वेळ पडली तर नार्को टेस्ट घेण्याची मागणी आम्ही करणार आहोत .विष्णू चाटे ,सुदर्शन घुलेसह आकाची ही नार्को टेस्ट झाली पाहिजे .या सगळ्यात कुठे आकाचा आका आला तर त्याची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली .
अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना अटक करण्यात आली आहे. धारुर पोलिसांनी या दोघांना कर्नाटकमधून अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतो म्हणत दोघांनी मोहितेला मारहाण केली होती. सध्या अशोक मोहिते वर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
हेही वाचाः