Suresh Dhas on Walmik Karad : छोटे आकाला 2022 मध्येच ईडीची नोटीस आली होती. वाॅचमनच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. सुशील पाटील बिल्डर पुण्यात एफसी रोडवर वैशाली हॉटेलच्या बाजूला सात शॉप आका काढत आहे. त्या एका शॉपची किंमत पाच कोटी आहे. विष्णू चाटेची बहीण, आकाची दुसरी पत्नी आणि वाल्मिक आकाच्या नावावर शॉप आहे. हे 40 कोटींचे शॉप आहे. त्या  बिल्डरची भेट घेऊन आलो, विचारलं आमच्या आकाला काय काय दिले? आकाने 35 कोटींचे टेरिस मागितले होते. मगरपट्टा येथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी आहे आणि हा फ्लॅट कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे, ज्याची किंमत 75 कोटी आहे.  ड्राव्हरकडून आकाने राहण्यासाठी करार देखील करून ठेवले, असा सनसनाटी दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. 


इराणी समाजाचे लोक यांच्या जीवावर पिस्तुल घेतात 


सुरेश धस यांनी (Suresh Dhas on Walmik Karad) आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवताना दररोज एक खुलासा अन् गौप्यस्फोट वाल्मिक कराडविरोधात करत आहेत. सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुख हत्येचा आठ पानांचा पीएम रिपोर्ट आला. आका आणि त्यांचे आका यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. इराणी समाजाचे लोक यांच्या जीवावर पिस्तुल घेतात आणि अवैध धंदे करतात. त्यातून पोलीस कमिशन घेऊन आकाला वाटा जायचा, असा गंभीर आरोपही केला.  त्यांनी सांगितले की, परळी शहर पोलिस आका आणि आकाच्या सांगण्यावरून सर्व काही गोळा करण्याचे काम केले जाते. यांच्या हप्ताल्या  कंटाळून एक सिमेंट कंपनी परळी सोडून गेली, एक आका आत आहे दुसऱ्या आकाने याचे उत्तर द्यावे, असे आव्हान सुरेश धस यांनी केले. 


ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती करू नयेत


सोनी टीव्ही मधील सीआयडीची नियुक्ती आता करावी, कारण ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती करू नयेत, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री यांना देणार असल्याचा खोचक टोलाही सुरेश धस यांनी सांगितला. कसले प्रति मोर्चे काढत आहे तुम्ही? तुम्हाला संतोष देशमुख मुली, मुलाच्या डोळ्यातील पाणी तुम्हाला दिसत नाही का?  जोपर्यंत राष्ट्रपती यांची दयेची मागणी फेटाळून लावत नाही, तोपर्यंत एकत्र राहायचं असल्याचे सुरेश धस म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या