Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून सगळीकडे मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा केवळ धनंजय देशमुख यांचे बंधू म्हणून नाही तर 14 कोटी जनतेच्या मनातील राग आहे. जे हत्या करणारे आहेत ते सर्व ज्या दिवशी फाशीवर जातील तेव्हा सर्व शांत होईल असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले आहेत. (Suresh Dhas) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू या दोन घटनांमध्ये न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचं कुटुंबीयही उपस्थित आहे. या मोर्चात सुरेश धस बोलत होते. (Santosh Deshmukh Case)
काय म्हणाले सुरेश धस?
यात धनंजय देशमुख त्यांचे बंधू म्हणून नाही 14 कोटी जनतेच्या मनातील राग जे हत्या करणारे आहेत ते सर्व ज्या दिवशी फाशीवर जातील तेव्हा सर्व शांत होतील. सव्वा वर्ष झालं महादेव मुंडे यांचा खून करण्यात आलाय. त्यांचा आरोपी सापडत नाही. त्या बाईच्या डोळ्यात पणी आहे. तो मुलगा रडतोय त्याची चुक काय आहे. आकाचा किती प्रभाव तिकडच्या पोलीस वर होता हे कळतंय. (Suresh Dhas)
प्रॉपर्टी सवड्याच्या नावाने बावड्याच्या नावावर गेली
खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली.नियमाप्रमाणे जरी आरोपी असला नियमात जे सवलती दिल्या आहेत त्या घेण्याचा अधिकार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत जो तपास चालू आहे. विश्वास आहे जी डिमांड केलीय उज्वल निकम यांची नियक्ती आणि पळून गेलेला आरोपी यात कुठलीही सवलत दिली जाणार नाही असेही धस म्हणाले.दरम्यान वाल्मीक कराडच्या संपत्तीवर जप्ती आणल्यानंतर एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही.आका बाका चॊका सर्वांच्या नावावर आहे. प्रॉपर्टी सवड्याच्या नावाने बावड्याच्या नावावर गेली. असंही सुरेश धस म्हणाले. (Walmik Karad Property Seize)
राज्यातील अनेक भागात निघालेल्या आक्रोश मोर्चानंतर बीड आणि परभणीमधील घटनांची धग आता राज्याच्या राजधानीत पोहचल्याचे चित्र आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानपर्यंत असलेल्या या मोर्चानंतर या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईल आणि त्या ठिकाणी सध्या चौकशीची काय परिस्थिती आहे, ती उघड करा यासाठी ही मागणी करणार असल्याचे समाेर आले आहे. तसेच आज या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे देखील सांगण्यात आले आहे.
हेही वाचा:
Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...