मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन असताना त्याच्या आदल्या दिवशी खासदार सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसवरुन चर्चा सुरू झाली. 'सहन करायला शिक' हा आईने दिलेला सल्ला ताईंनी व्हाट्सप स्टेटसला ठेवल्यावर चर्चा तर होणारच. बरं या स्टेटसचं स्पष्टीकरण देताना आणखी एक स्टेटस सुप्रियाताईंनी ठेवलं. 'अन्याय होतो तो सहन करायचा' असं दुसरं स्टेटस त्यांनी ठेवलं. ते वाचून तर अनेकांच्या कन्फ्यूजनचा स्क्वेअर झाला. शरद पवारांनी काढलेल्या पक्षात, त्यांच्याच कन्येवर ज्या 4-5 टर्मच्या खासदार आहेत, त्यांच्यावर कसला अन्याय होत असेल अशा चर्चांना उधाण आलं.

Continues below advertisement

सहन करायला शिक... हा सल्ला सुप्रिया सुळेंना त्यांच्या आई म्हणजे प्रतिभाकाकींनी दिला. स्वत: सुप्रियाताईंनी आपल्या व्हाट्सप स्टेटसमध्ये हा किस्सा लिहिला. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंचं असं स्टेटस ठेवल्यावर चर्चा तर होणारच ना. 

Supriya Sule WhatsApp Status : ताईंना नेमकं काय म्हणायचं आहे? 

'आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी, अन्याय होत असतो. आपण काहीही करु शकत नाही. परिस्थिती आपल्या हाती नसते. तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं. कर्तव्य करत राहायचं.. आपले संस्कार कधी विसरायचे नाही' अशा आशयाचं स्टेटस ताईंनी ठेवलं.

Continues below advertisement

हे स्टेटस वाचल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंना नेमकं म्हणायचंय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्यावर सुप्रिया सुळेंशी संपर्क साधला पण त्यांनी तुर्तास बोलण्यास नकार दिला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सावध प्रतिक्रिया आली.

सुप्रिया सुळेंचे जुने सहकारी आणि अजितदादांचे खंदे कार्यकर्ते मात्र भरभरुन बोलले. सुप्रिया सुळेंवर त्यांच्या पक्षात अन्याय होत असेल असं सांगायलाही ते विसरले नाहीत. 

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांनी सुप्रिया सुळेंना गाठलं आणि स्टेटसबद्दल विचारलं. त्यावर आपलं स्टेटस हे आईसाठी होतं असं मोघम उत्तर त्यांनी दिलं. लोकशाहीत स्टेटस ठेवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे असं शरद पवार स्टाईल स्पष्टीकरणही दिलं.

Supriya Sule Emotional Post : पाच वर्षांपूर्वीही असंच स्टेटस 

या स्टेटसमुळे सुप्रिया सुळेनी पाच वर्षांपूर्वी केलेल्या अशाच गाजलेल्या स्टेटसची आठवण ताजी झाली असेल. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर सुप्रियाताईंनी पक्ष आणि परिवार दुभंगला अशा आशयाचे स्टेटस ठेवले होते. तसंच अजितदादांसाठी एवढं करुनही ते असं का वागले असा प्रश्नही उपस्थित केला होता. 

आज पाच वर्षानंतर राष्ट्रवादीच्या स्थापना दिनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंच्या स्टेटसचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. आपल्याच वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षात सुप्रियाताईंवर काय अन्याय होत असेल? कोण अन्याय करत असेल आणि कसा? प्रतिभाकाकींनी आपल्या लाडक्या लेकीला काय सहन करायला शिक असं सांगितलं असेल? आणि ते सुप्रिया ताईंना राष्ट्रवादीच्या स्थापनादिनी सार्वजनिक करावं असं का वाटलं असेल? असे अनेक प्रश्न सामान्य लोकांना पडत आहेत. 

ही बातमी वाचा: