Supriya Sule: देशात काँग्रेसचं सरकार आलं तरी गडकरींना केंद्रीय मंत्री करावं का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते चांगले मंत्री, त्यांना...
Supriya Sule: मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करतानाच काँग्रेस सरकारमध्येही त्यांना मंत्री ठेवता येईल का? या सूचनावजा प्रश्नावर याबाबत विचार करू असं वक्तव्य केलं आहे.
Supriya Sule On Nitin Gadkari: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कामांचं कौतुक विरोधी पक्षातील नेते देखील वारंवार करत असताना दिसतात. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. एका youtuber ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करतानाच काँग्रेस सरकारमध्येही त्यांना मंत्री ठेवता येईल का? या सूचनावजा प्रश्नावर याबाबत विचार करू असं वक्तव्य केलं आहे.
ही नितीन गडकरींसाठी सर्वात उत्तम कॉम्प्लिमेंट
भविष्यात केंद्रात काँग्रेस प्रणित सरकार आल्यानंतरही नितीन गडकरी यांच्याकडेच केंद्रीय मंत्री पद ठेवलं पाहिजे, अमेरिकेत बहुदा ओबामा यांनी बुशच्या काळातले संरक्षण मंत्री बदलले नव्हते असं उदाहरण देत मुलाखतकाराने केलेल्या सूचनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही त्यांच्यासाठीची (नितीन गडकरी) सर्वात उत्तम कॉम्प्लिमेंट आहे. मी नितीन गडकरींशी बोलून त्यांना विचारेन, खरंच हे शक्य आहे का. नितीन गडकरी हे चांगले मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2024 च्या निवडणुकीसाठी आम्ही जोरदार तयारी केली आहे. अजून दीड वर्ष आहेत, सर्व भाजप विरोधातील प्रादेशिक पक्षांशी चर्चा केली जाईल आणि एकत्रित येऊन लढलं जाईल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपचे बरेच नेते फेकतात. त्यांच्याकडून सतत 70 वर्षात काय केलं असा प्रश्न विचारला जातो. मात्र हे सगळे याच काळात बनलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिकलेत. या गोष्टी त्या विसरतात.
मिर्झापूर पाहिला आणि कालिन भैय्यांना फोनच लावला...
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मिर्झापूर माझी अलिकडच्या काळातील सर्वात आवडलेली. मी ही सिरीज पाहिल्यानंतर कालिन भैय्या पंकज त्रिपाठींना फोन केला. मला अनुप्रिया पटेलनं त्यांचा नंबर दिला. मी त्यांची फॅन असल्याचं सांगितलं. कालिन भैय्याचं पात्र मला खूप आवडलं असल्याचं मी त्यांना सांगितलं. मला पंकज त्रिपाठींनी सांगितलं की, मी बारामती, सातारा, फलटण या भागात फिरलो आहे. आम्ही खूप वेळ बोललो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमचं कुटुंब म्हणजे हम साथ साथ है सारखं आहे. पवार कुटुंब हे एकसाथ असतं. आम्ही लोकांची सेवा करतो म्हणून आम्ही 50 वर्षांपासून तिथं टिकून आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.