सुप्रिया सुळेंनी नेतृत्व केलंच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही, खासदार छत्रपती शाहू महाराजांचं वक्तव्य
सुप्रिया सुळे किती चांगल नेतृत्व करतील हे पाहायला पाहिजे,. त्यांनी नेतृत्व केलंच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतरं नाही असे वक्तव्य खासदार छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी केलं.

Chhatrapati Shahu Maharaj : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नुकताच परदेशात जाऊन भारताचा विचार तिथंपर्यंत पोहोचवला आहे. संसदेत सुद्धा त्या चांगल कामं करत आहेत. त्या परिवर्तन घडवून आणणार असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी केले. ते पुण्यात बोलत होते. सुप्रिया सुळे किती चांगल नेतृत्व करतील हे पाहायला पाहिजे,. त्यांनी नेतृत्व केलंच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतरं नाही असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांना शिवस्वराज्यभूषण पुरस्कार प्रदान
पुण्यात आज शिवस्वराज्यभूषण पुरस्कार सोहळा (Shivswarajya Bhushan award ceremony in Pune today) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते. शिवस्वराज्यभूषण पुरस्कार हा डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलत होते. गेल्याच आठवड्यात शिवराज्याभिषेकाचे सोहळा झाला आणि आज हा शिवराज्यभूषण सोहळा होतोय. इतिहास विचारवंतांना पुरस्कार दिला आहे. त्यामुळं ह्या कार्यक्रमाची उंची वाढल्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य या दोघांनाही चांगलं माहित आहे. त्यांच्या दोघांच्या माध्यमातून हे कार्य आज आपल्यापर्यंत पोहचल्याचे शाहू महाराज म्हणाले. पवार साहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाचा उपयोग गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रला झाला आहे आणि होतोय असे शाहू महाराज म्हणाले. महाराष्ट्रला पुरोगामीत्व महत्वाचे आहे असेही खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
खरा इतिहास समोर मांडण्यात जयसिंगराव पवार आणि आ. ह. साळुंखे यांचा खूप मोठा वाटा
या कार्यक्रमाला शरद पवार देखील उपस्थित होते. आज महाराष्ट्राच्या इतिहासतला महत्वाचा दिवस आहे. दोन विचारवंतांचा सन्मान होत असल्याचे शरद पवार म्हणाले. स्वातंत्र्यचा इतिहास नजरेसमोर ठेवतो, तेव्हा मुळशी सत्याग्रह हा सुद्धा त्यातला महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्रच्या इतिहासात ज्यांचं योगदान आहे, त्यांचं नाव पुढं आणण्याचा प्रयत्न विचारवंतांनी केल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रचा खरा इतिहास समोर आणण्याचा कामं ह्या सहकाऱ्यांनी केलं आहे. खरा इतिहास समोर मांडण्यात जयसिंगराव पवार आणि आ. ह. साळुंखे यांचा खूप मोठा वाटा आहे
महत्वाच्या बातम्या:
Supriya Sule On Ajit Pawar: दादासोबत जाण्यास ताईही तयार?; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी मोठं विधान, म्हणाल्या, शरद पवारांनी मला...
























