बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली. सुप्रिया सुळेंना सायकल चालवताना पाहून उपस्थित विद्यार्थिनीही भारावल्या.


बारामतीमध्ये काही स्वयंसेविका आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन उपस्थित होत्या. दोघींच्या हस्ते हे सायकल वाटप करण्यात आलं.

यावेळी सुप्रिया सुळे आणि स्काऊटेन यांना सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे दोघींनी काही अंतर सायकल चालवत पुढील कार्यक्रमात आगमन केलं.

पाहा व्हिडिओ :