Sunil Prabhu Complaint Against Assembly Speaker: अध्यक्ष पक्षपातीपणा, वेळकाढूपणा करत आहेत अशी तक्रार ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रतोद सुनील प्रभूंनी (Sunil Prabhu) केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारं पत्र प्रभूंनी विधानभवनाला लिहीलं आहे. अध्यक्ष शिंदे गटाला (Shinde Group) झुकतं माप देतायत, असा आरोप या पत्रात करण्यात आलं आहे. साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) शिंदे गटाला वाढीव वेळ देत कारवाई लांबवत आहेत असं या पत्रात म्हटलं आहे. 

आमदार अपात्रताप्रकरणी आजच्या सुनावणीतही सुनील प्रभूंची साक्ष होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी अनिल साखरे आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे विधानभवनात पोहोचले आहेत. सुनील प्रभू सुद्धा विधानभवनात आले थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल. 21 जूनच्या बैठकीसाठी बजावलेल्या व्हिपवरून काल दिवसभर प्रभूंना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी घेरलं. व्हिप बजावण्यातच आला नव्हता असा दावा काल सुनावणीदरम्यान महेश जेठमलानींनी केला. त्यावर उत्तर देताना प्रभूंनी तो दावा फेटाळला. आता आजच्या उलटतपासणीतही या व्हिपच्या सत्यतेवरूनच प्रश्नांचा रोख राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनावणीच्या संथगतीवर काल विधानसभा अध्यक्षांनी नाराजीही व्यक्त केली होती. 

आमदार अपात्रता प्रकरणी सुनील प्रभूंची उलटतपासणी 

आमदार अपात्रताप्रकरणी आजच्या सुनावणीतही सुनील प्रभूंची साक्ष होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी अनिल साखरे आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे विधानभवनात पोहोचले. सुनील प्रभूसुद्धा विधानभवनात सुनावणीला सुरुवात झाली आहे. 21 जूनच्या बैठकीसाठी बजावलेल्या व्हिपवरून काल (बुधवारी) दिवसभर प्रभूंना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी घेरलं. व्हिप बजावण्यातच आला नव्हता, असा दावा काल सुनावणीदरम्यान महेश जेठमलानींनी केला आहे. त्यावर उत्तर देताना प्रभूंनी तो दावा फेटाळला. आता आजच्या उलटतपासणीतही या व्हिपच्या सत्यतेवरूनच प्रश्नांचा रोख राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनावणीच्या संथगतीवर काल विधानसभा अध्यक्षांनी नाराजीही व्यक्त केली होती. 

पाहा व्हिडीओ : Shiv Sena MLA Disqualification Case : शिंदे गटाला वेळ वाढवून दिला, ठाकरे गटाचा आक्षेप