मुंबई : शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला आहे. 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही. 14 ऑगस्टला राज्यभर चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला.


मुंबईत सुकाणू समितीच्या सदस्यांची पत्रकार परिषद झाली. आमदार बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

कर्जमाफी करा आणि मगच ध्वजारोहण करा, असं सुकाणू समितीने सांगितलं. सरकारने कर्जमाफी केली नाही, शिवाय इतर मागण्यांवरही गांभीर्याने विचार केलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रात चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला.

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. त्यामुळे वारंवार मागणी करुनही सरकारने गांभीर्याने विचार न केल्यामुळे सुकाणू समितीने आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.

संबंधित बातम्या :

शेतकरी कर्जाबाबतचा जीआर तातडीने रद्द करा: सुकाणू समिती


सुकाणू समितीने 10 हजारांच्या मदतीच्या जीआरची कॉपी जाळली


संपूर्ण कर्जमाफी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन : सुकाणू समिती